दुर्मिळ हस्तलिखितांचे अभ्यासक संग्राहक डॉ. वा.ल. मंजूळ यांची माहिती !

पुणे – ‘अलंकापुरी माहात्म्य’ (श्रीक्षेत्र आळंदीचे माहात्म्य) सांगणारे सदाशिवलिखित १३० वर्षांपूर्वीच्या ‘ज्ञानलीलामृत’ या ओवीबद्ध हस्तलिखिताची दुर्मिळ प्रत प्रकाशात आली आहे. या ग्रंथाचे एकूण १८ अध्याय असून हस्तलिखित २५२ पृष्ठांचे आहे. ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे’चे माजी ग्रंथपाल आणि दुर्मिळ हस्तलिखितांचे अभ्यासक संग्राहक डॉ. वा.ल. मंजूळ यांनी या हस्तलिखिताचे महत्त्व विषद केले.
डॉ. मंजूळ म्हणाले, ‘‘ज्ञानलीलामृत’ या हस्तलिखिताचे मूळ स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडातील ६४ व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव आणि नारद यांच्या संवादात आढळते. या ग्रंथांमध्ये श्रीक्षेत्र आळंदीचा पूर्वइतिहास, ज्ञानदेवांसह भावंडांची चरित्रे संस्कृतमधून मांडली आहेत. या ग्रंथाचे शके १८१७ म्हणजे वर्ष १८९५ मध्ये ‘ज्ञानलीलामृत’ नावाने मराठीकरण करण्यात आले. त्याचे लेखक ‘सदाशिव’ असा उल्लेख आढळतो. सदाशिव हे मूळचे संत ज्ञानदेवकालीन अंतोबा कुलकर्णी यांच्या वंशातील आहेत. ज्ञानदेवांनी समाधीत प्रवेश करतांना अंतोबांनी त्यांचा हात आपल्या मस्तकी ठेवून शिष्यत्व स्वीकारले होते. नंतरच्या काळात आळंदीक्षेत्री अंतोबांचे वंशज नांदत असल्याची नोंद वंशपरंपरागत प्रत्यक्ष स्वरूपात पहावयास मिळते.’’
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
‘स्मार्ट’ फसवणूक !
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !