|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे मशिदींवर अनधिकृतपणे बसवलेले भोंगे हटवण्याची मोहीम चालू करण्यात आली. या वेळी पोलिसांनी शहरातील ४० मशिदींवरील भोंगे हटवले. पोलिसांनी मशिदींच्या इमामांना (इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे वापरणे कायद्याने चुकीचे असल्याचे सांगितले.
🔇 UP Govt’s bold drive against noise pollution!
🚓 Police remove loudspeakers from 40 mosques in Lakshmanpur area
🛕 Temples too included; over 1 lakh loudspeakers removed across the State so far
❓ What’s stopping other States from doing the same?#SoundPollution… pic.twitter.com/J1FW3oX8M6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 11, 2025
पोलिसांचे एक पथक वझीरगंज येथील गोलागंज मशिदीत गेले. इमामांना बोलावून मशिदीवरील भोंगे हटवण्यास सांगितले. भोंगे उंचावर बसवलेले होते. पोलिसांच्या साहाय्याने ते खाली उतरवले गेले. त्यानंतर पोलिसांचे पथक मलका जमानी मशिदीत, तसेच गुइन मार्गावरील मशिदीत गेले आणि तेथील भोंगे हटवण्यात आले. मशिदींवरील भोंगे हटवल्यानंतर पोलीस बटुक भैरव मंदिरात पोचले. तेथे लावलेले भोंगेही त्यांनी हटवले.
उत्तरप्रदेशातील योगी सरकारने २०२२ पासून धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवण्याची मोहीम चालू केली असून आतापर्यंत राज्यभरातील धार्मिक स्थळांवरून १ लाखाहून अधिक भोंगे हटवण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकाअसे अन्य राज्यांचे पोलीस का करू शकत नाहीत ? |

‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !