Terrorist Doctor Arrested : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथून डॉक्टर असलेल्या जिहादी आतंकवाद्याला अटक

रुग्णालयात लपवली होती शस्त्रास्त्रे

जिहादी डॉक्टर आदिल अहमद राथर अटक 

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर पोलिसांनी ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेचे जाळे पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करणारा जिहादी डॉक्टर आदिल अहमद राथर याला अटक केली आहे. तो काही महिन्यांपासून उत्तरप्रदेशातील सहारनपूरच्या अंबाला रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होता आणि अलीकडेच त्याने तेथील एका महिला डॉक्टरशी विवाह केला होता. त्याला सहारनपूर येथूनच अटक करण्यात आली. आदिल मूळचा काजीगुंड येथील रहिवासी असून तो यापूर्वी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता.

रुग्णालय आतंकवाद्यांचे ठिकाण बनवले

आदिलने ज्या रुग्णालयात काम केले, त्याच ठिकाणी त्याने आतंकवाद्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. तो रुग्णालयातच शस्त्रास्त्रे लपवत असे आणि आतंकवादी कारवायांना साहाय्य करत असे. पोलिसांनी रुग्णालयातील लॉकरमधून एक ‘असॉल्ट रायफल’ आणि काही संशयास्पद साहित्य जप्त केले आहे.

जैशचे जाळे पुन्हा उभारण्याची योजना

आदिल काश्मीर खोर्‍यात जैश-ए-महंमदचे जाळे पुन्हा उभे करण्याचा कट रचत होता. तो साथीदाराहसह श्रीनगरच्या नौगाम भागात जैशचे भित्तीपत्रक लावण्यातही सहभागी होता. या भित्तीपत्रकानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीद्वारे अन्वेषण करून ६ जणांना कह्यात घेतले. यांमध्ये एक डॉक्टर होता, जो सांकेतिक नावांच्या माध्यमातून त्याच्या जाळ्यातील अन्यांशी संपर्क साधत असे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सहारनपूर येथे धाड घालून आदिलला पकडले. या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक झाली असून पोलीस आता आदिलच्या संपर्कातील अन्य व्यक्ती कोण आणि जैशच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांनी कोणती भूमिका बजावली ? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

संपादकीय भूमिका

मुसलमान अशिक्षित असल्याने आतंकवादाकडे वळतात, असे सांगणारे यावर काही बोलतील का ?