‘गौंड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’च्या संकेतस्थळाचे लोकार्पण !

मुंबई, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘प्रभु श्रीराम यांनी बाणाने उत्पन्न केलेली गंगा’ अशी आध्यात्मिक ख्याती असलेल्या वाळकेश्वर येथील बाणंगगेची त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी, ५ नाव्हेंबरला भावपूर्ण महाआरती करण्यात आली. या सोहळ्याला नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे महंत आचार्य महामंडलेश्वर श्री सुधीरदास महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘गौंड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’द्वारे आयोजित केलेल्या या सोहळ्याला सहस्रावधी भाविक उपस्थित होते. राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा हेही सोहळ्याला उपस्थित होते.
शंखनादाने सोहळ्याला प्रारंभ झाला. सहस्रावधी दिव्यांच्या प्रकाशामध्ये भाविकांनी बाणगंगेची आरती केली. या वेळी पारंपरिक पद्धतीने ढोलवादन करण्यात आले. या वेळी श्री जबरेश्वर महादेव देवस्थानाकडूनही बाणगंगेची आरती झाली. बाणगंगेच्या काठावर भगवान शिवाची ध्यानस्थ बसलेली मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली. आरतीनंतर भक्तीगीतांचे गायन आणि नृत्य सादर करण्यात आले. उपस्थित भाविकांनी ‘हर हर शंभो, जय शिवशंकर’ असा गजर केला. गौंड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रसाद महाले यांनी उपस्थितांचा सन्मान केला. या वेळी ट्रस्टच्या संकेतस्थळाचे आचार्य महामंडलेश्वर श्री सुधीरदास महाराज यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
| पूर्वनोंदणीद्वारे प्रवेश !
महाआरतीला येणार्या भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पूर्वनोंदणी करून येण्याचे आवाहन ट्रस्टने केले होते. त्यानुसार भाविक ऑनलाईन नोंदणी करून या सोहळ्याला उपस्थित राहिले. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी अनेक स्वयंसेवक सेवारत होते. |
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !