
कोल्हापूर, १ नोव्हेंबर – गेली अनेक वर्षे सीमाभागातील लोक कर्नाटक सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात १ नोव्हेंबर हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी आणि सीमालढ्यात मृत्यूमुखी पडलेल्या विरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेनेचे पदाधिकारी बेळगावकडे जातात. असे असले, तरी प्रत्येक वर्षी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीच्या पुलावर कर्नाटक पोलीस शिवसैनिकांना अडवतात. यंदाही कोल्हापूर येथून मोठ्या संख्येने शिवसैनिक बेळगावकडे जाण्यास निघाले असता कागलजवळ कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखले.
या प्रसंगी ‘बेळगाव, बीदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या पदाधिकार्यांना कागल पोलीस ठाण्यात आणून नंतर सोडून देण्यात आले. यात मुख्यत्वेकरून सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष धैर्यमाने यांना पोलिसांनी पुलावर अडवले. या वेळी काही काळ पुणे-बेंगळुरू महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला होता, तसेच काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
| उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनाही दूधगंगा नदी पुलावर अडवण्यात आले. या प्रसंगी तेथे उपस्थित असणारे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘बेळगाव येथे फेरी काढणार्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही जात असतांना आम्हाला पोलिसांनी रोखले. बेळगाव, बीदर-भालकीसह अनेक गावे महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत असतांना कर्नाटक सरकार मात्र त्यांची गळचेपी करत आहे, याचा आम्ही निषेध करतो.’’ |
| महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न इतकी वर्षे प्रलंबित ठेवणे हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! |
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !