
मुंबई – काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार पक्ष आणि मनसे यांच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी मतचोरीच्या सूत्रावर मुंबई येथे सरकारविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्धव बाळासाहेब गटाचे आमदार अनिल परब यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे विरोधक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील, असा अंदाज आहे.
आमदार अनिल परब म्हणाले की, हा मोर्चा १ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता ‘फॅशन स्ट्रीट’ येथून चालू होईल. नंतर मेट्रो चित्रपटगृहमार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाचा दायित्वशून्य कारभार, मतांमधील घोळ, मतांचा गैरव्यवहार आदी सूत्रांच्या विरोधात हा ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना सत्य कळावे आणि असत्य जनतेपुढे जावे, यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष अन् मनसे या मोर्चात सहभागी होतील.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा