माफियांनी ड्रोन वापरून बाँब टाकले !

रिओ दि जानेरो (ब्राझिल) : येथील पोलिसांनी अमली पदार्थ माफियांच्या विरोधात केलेल्या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या कारवाईत ४ पोलिसांसह ६४ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ८० हून अधिक लोकांना अटकही केली आहे. ‘रेड कमांड’ म्हणून ओळखल्या जाणार्या कुख्यात टोळीविरुद्धच्या ही कारवाई चालू करण्यात आली. २ सहस्र ५०० पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस कारवाई करू लागल्यावर रेड कमांड टोळीच्या गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला, तसेच ड्रोनमधून बाँब टाकले. त्याला पोलिसांनी योग्य प्रत्युत्तर दिले. या कारवाईमुळे जवळपास रहाणार्या रहिवाशांमध्ये भीती पसरली, जे परिस्थितीचे वर्णन ‘युद्ध क्षेत्र’ म्हणून करत आहेत. या गोळीबारात अनेक नागरिक घायाळही झाले. या कारवाईत २०० किलोहून अधिक अमली पदार्थ, अनेक रायफल्स आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली.
संपादकीय भूमिकागुन्हेगारी मोडून काढण्यासाठी अशीच कृती करावी लागते ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !