|
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘हिंदूंनी आम्हाला कधीच इतक्या अमानुष पद्धतीने वागवले नाही, जितके अत्याचार पाकिस्तानी सैनिकांनी कारागृहात केले. कारागृहात असलेल्या अनेक उलेमांनी कुराणावर हात ठेवून शपथ घेतली आहे की, जर भारताने पाकिस्तानवर आक्रमण केले, तर आम्ही भारताचे समर्थन करू’, असे विधान करणारे पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मौलवी गुलजार यांना अटक करण्यात आली आहे.
🇵🇰 Shocking truth from within Pakistan
Cleric Maulvi Gulzar arrested in Khyber Pakhtunkhwa after saying:
🗣️ “Hindus never treated us as cruelly as the Pak Army did.”He admitted Pak soldiers tortured Muslims & called Indian troops more humane!
When even a cleric sees the… pic.twitter.com/w20bSQgbnJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 29, 2025
भारतीय सैन्य पाक सैन्यापेक्षा अधिक मानवतावादी !
पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी गुलजार यांना एका सार्वजनिक सभेत सैन्य आणि गुप्तचर विभाग यांवर टीका केल्यानंतर अटक केली. गुलजार यांनी भाषणात सांगितले होते की, पाकिस्तानी सैन्याने मुसलमान आणि मदरशातील विद्यार्थी यांना जितकी अमानुष वागणूक दिली, तितकी कोणताही हिंदु किंवा भारतीय सैनिक यांनी दिली नाही. भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्यापेक्षा अधिक मानवतावादी आहे.
गुलजार यांचे विधान पाकमधील लोकांतील वाढता असंतोष
तज्ञांच्या मते मौलवी गुलजार यांचे वक्तव्य पाकिस्तानी सैन्याच्या प्रतिष्ठेतील घसरण आणि लोकांमधील वाढता असंतोष यांचे स्पष्ट द्योतक आहे. धार्मिक नेत्यांकडून उघडपणे भारताला पाठिंबा मिळणे, हे पाकिस्तानच्या राष्ट्रीय एकतेसाठी, तसेच सैन्याच्या नियंत्रणासाठी मोठी चेतावणी मानली जाते. ही घटना पाकिस्तानातील अंतर्गत अस्थिरतेचा आणि सुरक्षा यंत्रणांच्या मर्यादांचा दाखला आहे, जी देशाच्या स्थैर्याला गंभीर आव्हान निर्माण करू शकते.
संपादकीय भूमिका
|
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप