
मैसुरु (कर्नाटक) : देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण श्रीरामलल्लाची भावविभोर मूर्ती बनवणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांना देण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी नुकतीच श्रीरामलल्लाची मूर्ती बनवणारे मैसुरू येथील शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांच्या मूर्तीशाळेत जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विशेष निमंत्रण दिले. श्री. अरुण योगीराज यांनीही देहली येथील महोत्सवात उपस्थित रहाण्याची इच्छा दर्शवली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, म्हणजेच २१ ऑक्टोबर या दिवशी श्री. अरुण योगीराज आणि त्यांची पत्नी सौ. विजेता यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आशीर्वाद घेतले अन् या वेळी त्यांनी त्यांची मूर्तीशाळा दाखवली.
या प्रसंगी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री. अरुण योगीराज यांच्याशी बोलतांना श्रीरामाची मूर्ती बनवतांना त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांविषयी मुलाखत घेतली. (ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. – संपादक)
कोट्यवधी भारतियांच्या आकांक्षांना आकार देणारे अरुण योगीराज !![]() २२ जानेवारी २०२४ हा केवळ एक दिवस नव्हता, तर तो एका नव्या युगाचा आरंभ होता. या ऐतिहासिक क्षणाच्या केंद्रस्थानी होते शिल्पकार श्री. अरुण योगीराज ! असे शिल्पकार की, ज्यांनी कोट्यवधी भारतियांच्या आकांक्षांना आकार दिला. त्यांची निर्मिती केवळ एक मूर्ती नाही, तर ५०० वर्षांहून अधिक वर्षांतील अगणित त्याग, संघर्ष आणि उत्कट प्रार्थनांचा समुच्चय आहे. हा तो क्षण होता, जेव्हा भारताने दिव्य अशा श्रीरामलल्लांना अखेरीस एका तंबूतून भव्य अयोध्या मंदिरात त्यांचे स्वतःचे योग्य स्थान घेतांना पाहिले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर वाचा ! – हिंदुत्वाचे शिलेदार ! |

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !