(यू ट्यूबर : स्वतःच्या यू ट्यूब वाहिनीद्वारे व्हिडिओ प्रसारित करणारी व्यक्ती)

देहली – भारतात आलेला एक विदेशी ‘यू ट्यूबर’ येथील मोहमदीन रस्त्यावरील लोकांना उत्साहाने दिवाळीच्या शुभेच्छा देत ‘नमस्कार’ म्हणत असतांना एका संतप्त मुसलमानाने त्याला ‘सलाम वालेकुम’ असे म्हणायला लावले.
🔥 Shocking Intolerance! 😡
A New Zealand YouTuber wished everyone #Diwali with a simple ‘Namaskar’, but was forced to switch to ‘Salam Walekum’ by a fundamentalist!
Is this India or Pakistan? 🤔
Why can’t a respectful Hindu greeting like ‘Namaskar’ be accepted?This open… pic.twitter.com/wYuCNMgPkl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 27, 2025
१. न्यूझीलंड येथील हा ‘यू ट्यूबर’ सध्या भारतात आला आहे. दिवाळीच्या उत्साही वातावरणात तो दुकानांमधील लोकांना शुभेच्छा देत होता. तो एका उपाहारगृहाच्या बाहेर उभे राहून तेथील पुरुष आचार्यांना त्याने दिवाळी शुभेच्छा देत ‘नमस्कार’ म्हटले; परंतु यावरून संतप्त झालेल्या एका धर्मांध मुसलमानाने ‘यू ट्यूबर’ला ‘सलाम वालेकुम ! नो नमस्कार. धीस इज मोहमदीन स्ट्रीट’ (सलाम वालेकुम म्हणा ! नमस्कार नाही. हा मोहमदीन रस्ता आहे), असे सांगत त्यालाही ‘सलाम वालेकुम’ म्हणायला लावले.
२. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एकाने प्रतिक्रियाही व्यक्त करतांना म्हटले की, प्रकाशाच्या उत्सवात शुभेच्छांवरून वाद घालण्याइतके ऐक्याचे रडगाणे दुसरे कोणते नाही. काही लोकांना थोडाही प्रकाश सहन होत नाही.
३. ‘सलाम वालेकुम’ म्हणणे ही काही अडचण नाही; पण त्या धर्मांध मुसलमानाने ‘नमस्कार’ म्हणण्यास ज्या पद्धतीने विरोध केला, त्यावरून असे दिसून येते की, त्याला उपचारांची पुष्कळ आवश्यकता आहे. त्याला पकडून प्रेमाने किंवा धाकाने समजावून सांगावे; कारण त्याला त्याविना समजणार नाही, असे दिसते’, असे अन्य एका व्यक्तीने लिहिले आहे, तसेच या घटनेविषयी त्याने देहलीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालय, देहली पोलीस आणि पोलीस आयुक्त यांच्या ‘एक्स’ खात्यांना सूचित केले आहे.
संपादकीय भूमिका
|
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !