खोलीमालक असलेल्या पोलिसानेही ४ महिने शारीरिक-मानसिक छळ केल्याचा आरोप

सातारा : येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या आधुनिक वैद्य असलेल्या महिलेने २३ ऑक्टोबरच्या रात्री आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी महिला डॉक्टरने तिच्या हातावर पेनाने लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’मध्ये २ पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यात तिने तिच्या मृत्यूला पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोघेजण उत्तरदायी असल्याचे आणि त्यांनी शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिला गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकली होती. ‘या प्रकरणी दोन्ही आरोपी पोलिसांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी केली जात होती. शेवटी संबंधित पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे. पीडितेच्या भावाने ‘पोलिसांनी तक्रार नोंद करण्यास ४ ते ५ घंटे विलंब केला आणि त्या वेळी कुणा खासदाराचा पोलिसांना संपर्क झाला होता’, असे प्रसारमाध्यमांना सांगितले.
पीडितेने तिच्या ‘सुसाईड नोट’मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाल बदने उत्तरदायी असून त्याने ४ वेळा माझ्यावर बलात्कार केला. घरमालक आणि पोलीस प्रशांत बनकर यानेही मागच्या ४ महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश !
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर नोंद घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित उत्तरदायी पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर कारवाई होईल ! – पंकज भोयर, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री
या प्रकरणी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर प्रतिक्रिया देतांना म्हणाले,
Mumbai: On the case of a doctor’s suicide in Satara, Minister of State for Home (Rural) Pankaj Bhoyar says, “A female doctor has died by suicide while on duty in Satara. The police administration has been informed, and an inquiry is underway. Whoever is found guilty will face… pic.twitter.com/HWMbvDIiLM
— IANS (@ians_india) October 24, 2025
‘‘सातारा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झाली असून तात्काळ गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेत जो कुणी सहभागी असेल, त्याच्यावर कारवाई होईल.’’
दोषींवर कारवाई होईल ! – रूपाली चाकणकर, राज्य महिला आयोग

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, संबंधितांवर गुन्हा नोंद केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई होईल.
राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. सद्यस्थितीत याप्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (N), 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे.
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) October 24, 2025
संपादकीय भूमिका
|
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !