पुणे येथे बजरंग दल आणि पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत फटाक्यांचा साठा जप्त

पुणे – येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गोळीबार मैदान परिसरातील फटाक्यांच्या दुकानांवर देवी लक्ष्मीमातेचे चित्र असलेले ‘लक्ष्मी बॉंब’ विक्रीस ठेवल्याचे समजले. यानंतर ‘बजरंग दल’ आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत विक्रीस ठेवलेल्या फटक्यांचा साठा कह्यात घेतला. धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी फटका विक्रेत्यांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोळीबार मैदान परिसरातील काही फटाक्यांची दुकाने उभारली आहेत.
काही दुकानांतील फटाक्यांवर लक्ष्मीमातेचे चित्र छापण्यात आले होते. ज्यामुळे श्रद्धाळू हिंदु समाजामध्ये तीव्र अप्रसन्नता निर्माण झाली होती. ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात धार्मिक भावनांचा अवमान झाल्याचा आरोप करत अशा प्रकारच्या उत्पादनांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !