अंतर्मुख करणारी दिवाळी !

दीपावली म्हणजे दिव्यांची रांग. प्रकाशाद्वारे आनंदोत्सव साजरा करणे. दीपावलीच्या प्रत्येक सणाच्या दिवसाचे महत्त्व पाहिले, तर विविध देवतांना असुरांचा नाश केला आणि म्हणून दिवाळीचे विविध दिवस साजरे करण्याची पद्धत पडली.  वामनाने बळीराजाला पाताळात गाडले. त्रेतायुगात श्रीरामाने क्रूर रावणाचा वध केला. प्रजेवरचे संकट दूर झाले. द्वापरयुगात श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. आताही प्रजेवर एवढ्या विविध प्रकारची संकटे आहेत की, विचारता सोय नाही. अगदी तत्कालीन युगांप्रमाणेच विविध संकटरूपी असुर आज समाजावर प्रबळ झाले आहेत.

कलियुगातील आतंकवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे बलाढ्य असुर देशापुढील मोठे संकट बनून उभे आहेत. पाश्चात्त्य विकृतीच्या प्रभावामुळे समाजाची नैतिकता रसातळाला गेली आहे. त्यामुळे आजही कुणीतरी ‘धर्माचरण’रूपी अवताराने येऊन अनैतिकता नष्ट करून मूल्यांचा उदय करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘हलाल जिहाद’ आदी जिहादरूपी असुर सनातनी लोकांना त्रास देत आहेत. धर्मांतराचा भला मोठा राक्षस हिंदूंना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास देत आहे की विचारता सोय नाही. त्यामुळे हिंदूंची संख्या घटत आहे. अहिंदूंनी चालवलेले हे एक प्रकारचे मोठे युद्धच आहे.

हिंदूंच्या सर्वांत मोठ्या सणाच्या वेळी हिंदूंनी दीपावलीचा उद्देश विसरता कामा नये. मागील युगात साक्षात् अवतार श्रीराम, श्रीकृष्ण यांनी केलेले कार्य पाहून आताही त्यांचा आदर्श घेऊन हिंदूंनी मार्गक्रमण केले पाहिजे. हिंदूंनी सर्वांना जागृत करून संघटित करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे, तर या कलियुगातील विविध असुरांना तोंड देऊन ते त्यांना पराभूत करू शकतील. हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. सध्याच्या कलियुगात आपण मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नाही. आम्ही सारे सनातनी पीडित झाल्याप्रमाणे वावरत आहोत. कुठल्या तरी भयाच्या सावटाखाली वावरत आहोत. हे भय दूर होऊन मोकळा श्वास घेणारी पहाट उगवली पाहिजे. कुठे गोमाता कापली जात आहे, कुठे मुलगी पळवली जात आहे, कुठे महिलेवर अत्याचार होत आहे, कुठे गंगा प्रदूषित होत आहे.  कुठे भूमीवर आक्रमण होत आहे. हिंदू या सर्वांखाली पिचले जात आहेत. या सर्व दुष्प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी हिंदूंनी एक होणे, ही काळाची आवश्यकता आहे. वरील स्थिती पहाता लक्षात येईल की, आपण खरे म्हणजे पारतंत्र्यातच जगत आहोत. खरी दिवाळी जर यायची असेल, तर जोपर्यंत धर्माचरण करणारा नैतिक राजा आणि प्रजा यांच्या हिंदु राष्ट्राची उभारणी होणेच आता आवश्यक आहे. या दिवाळीला अंतर्मुख होऊन याचा विचार करूया आणि भावभक्तीने धर्माचरण करून या असुरांना नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्र येण्यासाठी दिवाळीतील दीपांना प्रार्थना करूया !

– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा