मुसलमान विद्यार्थिनीला कॅथोलिक शाळेत हिजाबला अनुमती दिल्याचे प्रकरण !
थिरुवनंतपूरम् – केरळ उच्च न्यायालयाने एका मुसलमान विद्यार्थिनीला एका खासगी शाळेत हिजाब (डोके आणि मान झाकावयाचे वस्त्र) परिधान करण्यास अनुमती देणार्या सरकारी आदेशाला तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देण्यापूर्वी राज्य सरकारला स्वतःचे मत स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. एर्नाकुलम् येथील शिक्षण उपसंचालकांनी ख्रिस्ती व्यवस्थापनाखालील सेंट रिटा पब्लिक स्कूलला शाळेत मुसलमान विद्यार्थिनीला हिजाब घालण्याची अनुमती देण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला शाळेने थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
१. शाळेचा दावा आहे की, राज्य शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या (‘सी.बी.एस्.ई.’च्या) शाळांच्या अंतर्गत नियमांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ‘ड्रेस कोड’सारख्या (वस्त्रसंहिता) विषयांवर निर्णय घेण्याचा अधिकार केवळ ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’चा आहे.
२. शाळेचे असेही म्हणणे आहे की, धार्मिक पोषाखाला अनुमती दिल्यास संस्थेच्या ‘धर्मनिरपेक्ष आणि समावेशक वातावरण’ यांवर परिणाम होईल.
३. न्यायमूर्तींनी नमूद केले की, सेंट रिटा ही ‘सी.बी.एस्.ई.’ शाळा असल्याने ती थेट राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे सरकार शाळेविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू शकत नाही. न्यायमूर्तींनी राज्याच्या अधिवक्त्यांना सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !