भाजपचे निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांची कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून मागणी

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार खासगी संस्था आणि अशासकीय संस्था यांना सरकारी मालमत्ता, शैक्षणिक संस्था अन् सार्वजनिक जागा यांचा खासगी किंवा संस्थात्मक कामांसाठी वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर तटस्थता आणि निष्पक्षता समाजातील सर्व घटकांमध्ये समान रितीने लागू करणे आवश्यक आहे. योग्य प्राधिकृत अधिकार्यांची अनुमती न घेता लोक सार्वजनिक रस्ते आणि सरकारी आवारात नमाजपठण करतांना आढळले आहेत. सरकारने विनाअनुमती घेऊन नमाजपठण करणार्यांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, असे पत्र भाजपचे निलंबित आमदार बसवराज यत्नाळ यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिले आहे. त्यांनी ते पत्र ‘एक्स’वर प्रसारित केले आहे.
🚨 Suspended BJP MLA @BasanagoudaBJP takes a stand!
He’s written to CM Siddaramaiah demanding action against those offering Namaz on public roads & govt premises without permission
Yatnal points out 👇
1️⃣ Such gatherings obstruct traffic & risk public safety (Art. 19 & 21) 🚧… https://t.co/ec7VWa2h67 pic.twitter.com/DcVypycEZV— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 17, 2025
या पत्रात पुढे म्हटले आहे की,
१. सार्वजनिक रस्ते आणि सरकारी आवारात नमाजपठण, अशा कृतींमुळे वाहने अन् पादचारी यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागतो आणि पादचार्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो.
२. यामुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ आणि २१ अंतर्गत नागरिकांना मिळालेल्या मुक्त संचार अन् सुरक्षिततेचे मूलभूत अधिकार यांचे उल्लंघन होते. सरकारी कार्यालये किंवा इतर कोणत्याही शासकीय अनुदानित संस्था यांमध्ये नमाजपठण करण्यासाठी कोणतेही विशेष प्रावधान नसावे.
३. सार्वजनिक मालमत्तेवर इतर संस्थात्मक कार्यांवर निर्बंध असतांना अशा प्रथांना अनुमती देणे, म्हणजे निवडक कार्यवाही करणे होय आणि यामुळे शासनाच्या विश्वासार्हतेला तडा जातो.
४. माझी नम्र विनंती आहे की, संपूर्ण राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना योग्य निर्देश जारी करावेत, जेणेकरून रस्ते, पदपथ किंवा सरकारी आवारात पूर्व अधिकृत अनुमतीविना नमाजपठण केले जाणार नाही.
संपादकीय भूमिकामुळात अशी मागणीच का करावी लागते ? विनाअनुमती कुठेही कुणी नमाजपठण करू नये, हे स्पष्ट आहे. रस्त्यावर नमाजपठणासाठी कधीही अनुमती मिळू शकत नाही; कारण तो वाहतुकीसाठी असतो. तरीही कुणी नियमांचे उल्लंघन करत असेल, तर प्रशासनाने स्वतःहून कारवाई केली पाहिजे ! |
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !