CBI Arrest Punjab DIG : पंजाबच्या पोलीस उपमहानिरीक्षकांना ८ लाख रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी अटक

घरातून जप्त करण्यात आले दीड किलो सोने आणि ५०० रुपयांच्या नोटांचे गठ्ठे !

पोलीस उपमहानिरीक्षक हरचरण सिंह भुल्लर व त्यांचा घरातून सापडलेले नोटांचे गठ्ठे

चंडीगड – पंजाब पोलिसांचे पोलीस उपमहानिरीक्षक हरचरण सिंह भुल्लर यांना सीबीआयने ८ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली. सीबीआय पथकाने चंडीगडमधील सेक्टर ४० येथील भुल्लर यांच्या घरावर धाड घालून रोख रक्कम आणि दागिने जप्त केले.

येथे ५०० च्या नोटांचे इतके गठ्ठे आढळले की, ते ठेवण्यासाठी टेबल पुष्कळ लहान होते. त्यानंतर भूमीवर चटई अंथरून नोटा मोजण्यात आल्या. नोटा मोजण्यासाठी ३ यंत्रे आणण्यात आली. घरातून सुमारे दीड किलो सोनेही जप्त करण्यात आले. यासह घरातून २२ आलिशान घड्याळे, ४० लिटर विदेशी दारू, ‘मर्सिडीज’ आणि ‘ऑडी’ गाड्या, तसेच बँकांमधील लॉकरच्या चाव्याही जप्त करण्यात आल्या.

संपादकीय भूमिका

अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, तरच समाजामध्ये लाचखोरी करणार्‍यांवर धाक बसेल !