हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या विरोधाचा परिणाम

पुणे, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक’ हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला. समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या ‘मना’चे श्लोक’ या पवित्र ग्रंथाचे नाव वापरल्यामुळे समर्थभक्त, हिंदु जनजागृती समिती, समस्त हिंदु आघाडी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी चित्रपटास विरोध केला होता. पुण्यातील कोथरूड परिसरातील ‘सिटी प्राईड’ आणि सिंहगड रस्त्यावरील ‘अभिरुची मल्टिप्लेक्स’मधील या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्यात आले. त्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्याही ‘बहुपडदा’ (मल्टिप्लेक्स) चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन (खेळ) बंद करण्यात आल्याचे दिसून आले. ‘बूक माय शोे’ या चित्रपटाशी संबंधित संकेतस्थळावरून माहिती घेतली असता या चित्रपटाच्या खेळांचे नियोजन दिसून आले नाही.
|
‘मना’चे श्लोक’ चित्रपट बंद पाडल्यानंतर मराठी कलाकार एकत्र आले आहेत. अशा प्रकारे एखाद्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवणे हे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या चमूच्या पाठीशी आहोत, असे मत अनेक कलाकारांनी व्यक्त केले आहे.
अभिनेत्री नेहा शितोळे यांची पोस्ट : ‘आयुष्यात आणि यंत्रणेविषयी असमाधानी असल्यामुळे साठलेला राग काढणे सोपे आहे; परंतु आपला साठलेला राग काढायला चित्रपटाचे फलक (पोस्टर) फाडणार्यांनो, आमचे काम बंद करायला लावणार्या कायदा भंग करणार्या ‘संस्कृतीरक्षकांनो’ कधीतरी आयुष्यात नीट विचार करून कुठल्या विचाराला पाठिंबा द्यायचा आणि कुठल्याला नाही हे ठरवा.’ (देवता, संत यांचा अवमान करण्याला विरोध करणे, हे यंत्रणेविषयी असमाधान म्हणणे, ही बौद्धिक दिवाळखोरीच आहे. हिंदूंच्या देवता, संत यांच्या अवमानाला हिंदूंचा नेहमीच प्रखर विरोध असेल. – संपादक)
दिग्दर्शक आशिष बेंडे यांची पोस्ट : ‘चित्रपटाचा ‘टीझर’ (चित्रपटाचे लघु विज्ञापन), ‘पोस्टर’ येऊन बरेच दिवस झाले. त्या वेळी हेच ‘टायटल’ (नाव) होते; पण बरोबर प्रीमियरच्या (पहिल्या खेळाला) दिवशीच भावना दुखावल्या जातात, हे जरा गमतीशीर आहे.’ (हिंदुत्वनिष्ठ विरोध करतच आहेत; मात्र सनदशीर विरोधाला केराची टोपली दाखवली जाते किंवा दुर्लक्ष करण्यात येते. आता खेळ बंद केल्यावर मात्र दिग्दर्शक महाशय जागे झालेले दिसतात ! – संपादक) सचिन गुरव यांची पोस्ट ‘तिकडे जोरजोरात आरडाओरडा करून ‘शो’ बंद पाडणार्या किती लोकांना श्लोक पाठ आहेत ? २५ ऑगस्टला चित्रपटाची घोेषणा झाली. तेव्हापासून हे लोक झोपले होते का?’ (स्वत: हिंदू असून संतांच्या श्लोकाचे विडंबन करणार्यांना लाज वाटली पाहिजे. वर इतरांना झोपलेले म्हणणे म्हणजे स्वत: गाढ झोपेतच आहेत, हे हिंदूंना लक्षात आले. – संपादक)
अभिनेत्री सायली संजीव, सोनाली कुलकर्णी, आदिनाथ कोठारे, गिरीजा ओक, सुहृद गोडबोले यांनीसुद्धा या घटनेचा निषेध नोंदवत ‘आम्ही या चित्रपटाच्या चमूच्या पाठीशी आहोत’, असे म्हटले आहे.
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !