|

सांगली, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५६७ पदांसाठी चालू असलेली नोकरभरतीची प्रकिया तात्काळ स्थगित करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार विभागाला दिला आहे, अशी माहिती भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. नोकरभरती प्रक्रिया पारदर्शी व्हावी, यासाठी ‘आय.बी.पी.एस्.’ आणि ‘टी.सी.एस्.’ यांपैकी एका आस्थापनाची निवड करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
श्री. सदाभाऊ खोत म्हणाले की,
१. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती प्रक्रियेवर आम्ही आक्षेप घेतला होता. पूर्वी झालेल्या नोकरभरतीची चौकशी चालू आहे. असे असतांना सहकार आयुक्तांनी नवीन नोकरभरतीस अनुमती कशी दिली ?
२. या प्रक्रियेत मोठी आर्थिक तडजोड होण्याची शक्यता आहे. काही मुलांनी बँकेच्या संचालकांकडे संपर्क साधला असता जागा भरल्या असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
३. एका जागेसाठी लाखो रुपयांचे शुल्क घेतल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती.
४. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २१ नोव्हेंबर २०२२ च्या निर्णयानुसार दोन्ही आस्थापनांच्या वतीने भरती प्रक्रिया नव्याने राबवण्याची सूचना अवर सचिवांनी केली आहे.
५. बँकेच्या कारभाराची प्रथम चौकशी झाली, तेव्हा ४४ प्रकरणांत अनियमितता आढळून आली. त्यानंतर बँकेची पुन्हा चौकशी झाल्यावर या प्रकरणात घट होत आता कलम ८८ अंतर्गत चौकशीत केवळ ४ प्रकरणे समाविष्ट केली आहेत.
६. बँकेतील घोटाळा दडपण्याचा हा प्रकार आहे. दोषी संचालकांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे या कारभाराची निवृत्त न्यायाधीश किंवा सहकार सचिव दर्जाच्या अधिकार्यांकडून चौकशी करण्यात यावी.
७. शेतकर्यांकडे कर्ज थकित राहिल्यास बोजा चढवला जातो, तसा दोषी संचालकांच्या घरादारांवर बोजा चढवावा. या दोषींना पुन्हा कधीही निवडणुका लढता येणार नाहीत, असे अपात्र ठरवावे.
८. या बँकेत नव्याने भरती प्रकियेसाठी सहकारमंत्री यांनी अनुमती देऊन ते दायित्वशून्यतेने वागले आहेत. या बँकेत नात्यागोत्यातील सर्वजण असल्याने वाटप करून भ्रष्टाचार केला आहे.
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis
संवाद साधण्याला प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राजापूर पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामावरून नगर परिषदेत सर्वच नगरसेवक आक्रमक
देशातील मंदिरांसाठी एका स्वतंत्र ‘सनातन संरक्षण बोर्ड’ किंवा समिती यांची स्थापना केली जावी ! – Shankaracharya Sadanand Saraswati