
प्रश्न : व्यक्तीच्या तळहातावरील काही भागांचा रंग लालसर, पांढरा किंवा गुलाबी असतो. हे कशाचे दर्शक आहे ? आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो ?
उत्तर :

१. तळहातावरील काही भाग लालसर असण्यामागील कारण
‘व्यक्तीच्या तळहातावरील एखादा भाग इतर भागांच्या तुलनेत लालसर असेल, तर ‘त्या भागाशी किंवा उंचवट्याशी संबंधित भावना, अपूर्ण इच्छा किंवा महत्त्वाकांक्षा व्यक्तीमध्ये अधिक असतात’, असे तो दर्शवतो. व्यक्तीच्या तळहातांवरील लालसरपणा असलेले विविध भाग काय दर्शवतात, हे पुढे दिले आहे.
१ अ. बोटांची वरची पेरे : व्यक्तीच्या बोटांची वरची पेरे लालसर असल्यास व्यक्तीमध्ये राग (क्रोध) दडपलेल्या अवस्थेत असतो. ती व्यक्ती रागाने अन् अधिकारी वृत्तीने परिस्थिती हाताळते.
१ आ. तळहातावरील शुक्राचा उंचवटा : व्यक्तीच्या तळहातावरील शुक्राचा उंचवटा लालसर असल्यास व्यक्तीमध्ये अपूर्ण इच्छा आणि आकांक्षा असतात. त्यांची पूर्ती करण्यासाठी व्यक्ती धडपडत असते.
१ इ. मंगळाचा वरचा उंचवटा : मंगळाचा वरचा उंचवटा लालसर असल्यास व्यक्ती वर्चस्ववादी, महत्त्वाकांक्षी आणि ऊर्जावान असते. तिच्या भावना अधिक प्रमाणात असंतुलित असतात.
१ ई. मंगळाचा खालचा उंचवटा : मंगळाचा खालचा उंचवटा लालसर असल्यास व्यक्तीमध्ये राग (क्रोध) आणि आकांक्षा दडपलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे ती लवकर निराश होऊ शकते.
१ उ. चंद्राचा उंचवटा : चंद्राचा उंचवटा लालसर असल्यास व्यक्तीमध्ये भावना आणि संवेदना दडपलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे ती निराश होऊ शकते. तिच्या भावना काही वेळा असंतुलितरित्या व्यक्त होतात.
१ ऊ. सर्व उंचवटे लालसर असणे : व्यक्तीच्या तळहातावरील सर्व उंचवटे लालसर असल्यास असंतुलित भावना आणि वैचारिक अस्पष्टता यांमुळे तिला मानसिक त्रास असू शकतो. तिच्यामध्ये क्रोध आणि अहंकार तीव्र असल्यामुळे ती स्वतःला, तसेच इतरांनाही हानी पोचवू शकते.
२. तळहातावरील काही भागांचा रंग पांढरा असण्यामागील कारण
व्यक्तीच्या तळहातांवरील काही भाग पांढरट असल्यास अगदी उलट परिणाम दिसून येतात, म्हणजे व्यक्तीमध्ये अपूर्ण इच्छा आणि महत्त्वाकांक्षा नसून तिच्यामध्ये निस्तेजता अन् उदासीनता असते.
२ अ. सर्व उंचवटे पांढरट असणे : व्यक्तीच्या तळहातावरील सर्व उंचवटे पांढरट असतील, तर निराशावादामुळे तिला मानसिक त्रास असू शकतो.
२ आ. पांढरट तळहातावर अव्यवस्थित रेषा असणे : व्यक्तीचा तळहात पांढरट असतांना जर तळहातावरील रेषाही अव्यवस्थित असतील, तर व्यक्तीला शारीरिक व्याधी होऊ शकतात.
३. तळहाताचा सर्वोत्तम रंग
‘फिकट गुलाबी रंग’ हा तळहातासाठी सर्वाेत्तम रंग आहे. हा रंग शरीर, मन आणि बुद्धी निरोगी असल्याचे सूचक आहे.’
(‘उच्च आध्यात्मिक स्तरावर (‘परात्पर गुरु’ पदावर) असलेल्या व्यक्तीमध्ये ‘प्रीती’ हा गुण प्रामुख्याने असतो. या गुणामुळे अशा व्यक्तीच्या संपूर्ण तळहाताचा रंग फिकट गुलाबी असतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दोन्ही तळहातांचा रंग फिकट गुलाबी आहे.’ – संकलक)
– हस्तरेषातज्ञ चेतना (सुनीता शुक्ला), ऋषिकेश, उत्तराखंड. (२२.८.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !