
मुंबई – येथे रस्ते आणि पदपथ येथे विनाअनुज्ञप्ती (परवाना) फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने या संदर्भात कठोर निर्णय घेतला असून अनधिकृत फटाकेविक्रेत्यांवर महापालिका कठोर दंडात्मक कारवाई करणार आहे. एवढेच नव्हे, तर त्यांचा मालही जप्त करण्यात येणार आहे.
१५ ऑक्टोबरपासून ते दिवाळी संपेपर्यंत या संदर्भात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. भुयारी मार्गात आवाज आणि धूर करणार्या फटाकेविक्रेत्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अधिकृत विक्रेत्यांनाही अतिरिक्त साठा ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या वर्षी अंधेरी, दादर, कुर्ला या भागांत सर्वाधिक अनधिकृत विक्री चालू असल्याचे लक्षात आले आहे. गेल्या वर्षी २५० किलो फटाके जप्त करण्यात आले होते.
पुण्यात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यावर पूर्णपणे निर्बंध
पुण्यात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत; पण आवाज न करता केवळ रंग निर्माण करणारे फटाके फुलबाजीसारखे फटाके या वेळमर्यादेनंतरही फोडण्यास मुभा असेल. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाने कठोर नियमावली घोषित केली आहे. ‘ॲटमबॉम्ब’ या नावाने ओळखल्या जाणार्या विशिष्ट स्फोटक फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि जवळ बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच १०० हून अधिक फटाके असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर यांवरही पूर्णपणे बंदी आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांच्या परिसरापासून १०० मीटरच्या आत कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यासही बंदी आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !