
मुरगाव – हेडलँड सडा, मुरगाव येथे मुरगावचे भाजपचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते श्री परशुराम गौभूमी संस्था गोशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार संकल्प आमोणकर यांनी सपत्नीक पूजाविधी केला. गेल्या विधानसभा अधिवेशनात त्यांनी त्यांच्या वतीने गोशाळा आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात गोशाळा उभारण्यात याव्या, अशी मागणी सरकारकडे केली होती. मुरगावची गोप्रेमी संस्था श्री परशुराम गौभूमी संस्था मंडळ यांच्या वतीने आमदार आमोणकर यांचे आभार मानून गोशाळा उभारल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. त्याचप्रमाणे संस्थेचे प्रमुख श्री. राघवेंद्र मेस्त, उपप्रमुख श्री. गजानन पाटील, खजिनदार श्री. सोनल मेस्त, श्री. दशरथ केणी, सौ. अनिता उपाध्याय, सौ. रूपा हेलवार, श्री. सुशांत पेडणेकर, संस्थेचे इतर सदस्य, तसेच विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख संजू कोरगावकर, श्यामसुंदर नायक, यशवंत बांदेकर, परशुराम शेट्ये, विष्णु केरकर आणि इतर यांनी आभार व्यक्त केले.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू