
सोलापूर – नवरात्रोत्सवानिमित्त कोजागरी पौर्णिमेला श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे पायी जाणार्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उळे (तालुका-दक्षिण सोलापूर ,जिल्हा-सोलापूर) या ठिकाणी प्रथमोपचारकक्षांची उभारणी करण्यात आली.
या कक्षांमध्ये चालतांना होणार्या दुखापती, थकवा, चक्कर, पाय सुजणे अशा किरकोळ तक्रारींवर तात्काळ उपचार करण्यात आले. यासाठी डॉ. (कु.) सुषमा महामुनी, आरोग्यसेविका सौ. स्नेहा भोवर, तसेच प्रथमोपचार सेवक सौ. गिरीशा व्हनमारे, सौ. जयश्री कांबळे आणि सौ. रजनी श्रीगांधी हे उपस्थित होते.

भाविकांना पिण्याचे पाणी, विश्रांतीसाठी जागा आणि मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली, तसेच प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पायी जातांना आरोग्याची काळजी घ्यावी आणि आवश्यकता असल्यास जवळच्या प्रथमोपचार कक्षात संपर्क साधावा.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !