|

रायपूर (छत्तीसगड) – ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री असेपर्यंत मी बंगाल राज्यात कथा करणार नाही. मी अलीकडेच बंगालला जाणार होतो; पण दीदींनी (ममता बॅनर्जी यांनी) त्यास अनुमती नाकारली. जोपर्यंत दीदी येथे आहेत, तोपर्यंत मी जाणार नाही. दादा आल्यावर मी जाईन, अशी भूमिका बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मांडली. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची हनुमान कथा १०, ११ आणि १२ ऑक्टोबर या दिवशी कोलकात्यात होणार होती; परंतु पावसाचे कारण देत अनुमती नाकारण्यात आली.
Dhirendra Shastri ji added:
🗣️ “I was going to Bengal, but Didi refused permission. I will go when Dada comes.”👉 Clarified no personal issue with Mamata Banerjee, but urged her not to act against Dharma.
👉 “We support no party. We stand with Sanatan Dharma & Hindutva.… pic.twitter.com/8pOXoHJeLg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 6, 2025
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !
१. मी बंगालला जाणार होतो, पण दीदींनी नकार दिला. बंगालमध्ये जिथे मला अनुमती मिळाली होती; तिथे पूर आल्याचे मला सांगण्यात आले.
२. देवाची इच्छा असेल, तर दीदी (मुख्यमंत्री पदावर) रहातील. आम्हाला त्यांच्याशी काही अडचण नाही; पण धर्माच्या विरोधात जाऊ नका.
३. आम्ही कोणत्याही राजकारणाच्या बाजूने नाही अथवा विरोधातही नाही. आम्ही सनातन धर्माच्या बाजूने आहोत. आम्ही नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने होतो आणि राहू.
४. धर्म म्हणजे केवळ घंटा वाजवणे, प्रार्थना करणे आणि टिळा लावणे नाही, तर अनीतीविरुद्ध आवाज उठवणे, हाही धर्म आहे.
५. संपूर्ण भारतातील धर्मद्रोही माझ्यामागे लागले आहेत; परंतु मी जिवंत असेपर्यंत हिंदुत्वासाठी जगण्याची प्रतिज्ञा करतो.
संपादकीय भूमिकाबंगाली हिंदूंनो, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासारख्या तेजस्वी संतांचा सत्संग मिळण्यासाठी तरी बंगाल सरकारला अनुमती देण्यास भाग पाडा ! |
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !