
अक्कलकोट – ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट’ यांच्या वतीने जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ५० लाख रुपये किमतीच्या ५ सहस्र जीवनावश्यक शिधासंचांचे वितरण करण्यात येणार आहे, तसेच मंडळाच्या सहयोगी ‘हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थे’च्या वतीने १ सहस्र पूरग्रस्त महिलांना साड्या देण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ’ हे गेली ३८ वर्षे अन्नदान, तसेच सामाजिक आणि धर्मादाय कार्यात सातत्याने कार्यरत असून, पूरग्रस्तांना साहाय्य करणारी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठी संस्था ठरली आहे.
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !