
पुणे येथे ‘गांधी सप्ताहा’मध्ये ‘नागरिकांची संविधानिक कर्तव्ये’ या विषयावर बोलतांना साम्यवादी विचारांचा प्रभाव असलेले सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी मोहनदास गांधी यांच्या रामराज्याची कथा सांगितली. आतापर्यंत साम्यवाद्यांनी भारताचा इतिहास ज्या पद्धतीने सांगितला, त्याचे पडसाद अभय ओक यांच्या भाषणात उमटले नाहीत, तर नवल होते. पुणे येथील कार्यक्रमातही हिंदूंना लक्ष्य करण्यास ते विसरले नाहीत. ‘रामराज्य म्हणजे केवळ हिंदूंचे राज्य नव्हे. सध्या ‘रामराज्य’ म्हणजे केवळ हिंदूंचे राज्य’, असा अर्थ काढला जातो. मोहनदास गांधी यांनी रामाला प्रतीक मानून स्वातंत्र्य, सत्य आणि अहिंसा यांवर आधारित आदर्श राज्याची संकल्पना मांडली’, असे ज्ञानामृत हिंदूंना पाजण्याचा स्वत:चा कित्ता निवृत्तीनंतरही चालू ठेवला. प्रभु श्रीराम हे हिंदूंचेच आहेत आणि रामराज्य हे हिंदूंचेच राज्य आहे, अशी हिंदूंची भूमिका असल्याचे थोपवण्याचा बालीश प्रयत्न या गृहस्थांनी केला. बालीश अशासाठीच की, सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असलेल्या या गृहस्थांनी हिंदूंवर असे विचार थोपवतांना एखादा संदर्भ, उदाहरण तरी द्यायला हवे होते; मात्र तसे काहीही न करता स्वत:च्या मनातील हिंदुद्वेष या गृहस्थांनी व्यक्त केला आणि त्याला गांधींच्या तत्त्वज्ञानाची जोड देऊन स्वतःचे विचार किती प्रगल्भ आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या पलीकडे निवृत्त न्यायमूर्तींच्या विधानाला काडीचीही किंमत नाही. स्वत:चे हिंदुद्वेषी विचार राज्यघटना, गांधी यांच्या नावाने खपवण्याची साम्यवाद्यांची खोड जुनीच आहे. अभय ओक यांचे बोलणेही अशाच प्रकारचे बरळणे आहे. ‘सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती’ या पदाची प्रतिष्ठा अभय ओक यांना लोकलज्जेखातर पाळावी लागत आहे. अन्यथा हिंदु धर्माची अपकीर्ती करण्यासाठी ते आणखी खालच्या पातळीला उतरले असते. हिंदूंवर आगपाखड करण्याची ओक यांची ही पहिली वेळ नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या पक्क्या हिंदुद्वेषी व्यक्तींसमवेत अभय ओक यांची ऊठबस होती. अभय ओक यांनी हिंदु धर्माला लक्ष्य करणारी अनेक वक्तव्ये यापूर्वीही केली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘गणेशोत्सव, छठपूजा, नवरात्रोत्सव या काळात मूर्ती विसर्जनामुळे नैसर्गिक जलस्रोतांची हानी होत नाही का ?
कोणता धर्म या सगळ्यांचे समर्थन करतो ?’, या शब्दांत ओक यांनी हिंदु धर्माला लक्ष्य केले. मनात द्वेष बाळगणार्या व्यक्तीने तोंड उघडले की, ती किती ज्ञानी आहे ? यापेक्षा किती अज्ञानी आहे ? याचे प्रदर्शन होत असते. ओक यांच्याविषयी असेच झाले आहे. ‘निवृत्त न्यायमूर्ती असल्यामुळे आपण मोठे तत्त्वज्ञानी आहोत’, असा ओक यांचा भ्रम स्वाभाविक आहे. त्यामुळेच या वेळीही त्यांनी हिंदूंना तत्त्वज्ञानाचे डोस पाजले.

ढोंगी तत्त्वज्ञान पुन्हा नको !
गांधी यांच्या कथित रामराज्याची उदाहरणे तर ओक यांनी देऊच नयेत. घरात एकट्या असलेल्या सीतामातेचे अपहरण करणार्या रावणाच्या राक्षस कुलाचा नाश करून प्रभु श्रीरामांनी पत्नीला सन्मानाने आणले. गांधीनी काय केले ? बंगालमधील ‘नोआखाली’ येथील हिंदु महिलांवर अत्याचार होत असतांना गांधींनी हिंदूंना शस्त्रांचा त्याग करायला सांगून मुसलमानांच्या हातून त्यांना मरायला सोडले. मुसलमान बलात्कार करण्यास आल्यावर प्रतिकार करण्याऐवजी आत्मत्याग करण्याचा उपदेश केला. गांधींप्रमाणे असे अहिंसेचे नेभळट तत्त्वज्ञान हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाही. भगवान विष्णूचा प्रत्येक अवतार दुर्जनांच्या नाशासाठीच झाला. सज्जनांवर अत्याचार करणार्यांचा नाश करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला. याला हिंसा म्हणत नाहीत, तर क्षात्रधर्म म्हणतात. गांधींनी अशा क्षात्रधर्माला हिंसा ठरवत अहिंसेचे अर्धवट ज्ञान पाजळले आणि ते तत्त्वज्ञान ओक हिंदूंच्या गळी उतरवत आहेत. रावणाचा नाश केल्याविना रामराज्याची स्थापना शक्य नाही. ओक यांनाही हे ठाऊक आहे; परंतु तरीही गांधींचे अर्धवट ज्ञान ओक हिंदूंपुढे पाजळत आहेत. याचे कारण हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा त्यांचा साम्यवादी ‘अजेंडा’ यातून दिसत आहे. ‘गांधींनी रामाला प्रतीक मानून स्वातंत्र्य, सत्य आणि अहिंसा यांवर आधारित रामराज्याची संकल्पना मांडली’, असे सांगून ओक यांनी स्वत:च्या अज्ञानाचा बाजार स्वत:च मांडला. गांधीजींनी रामराज्याची संकल्पना अवश्य मांडली; परंतु त्यांना त्याप्रमाणे आचरण कधीच जमले नाही. हिंदूंच्या हिताची गाजरे दाखवून गांधींनी हिंदूंचा घात केला. अशा ढोंगी व्यक्तीचा दाखला देऊन अोक हे गांधी यांच्याप्रमाणेच हिंदूंची दिशाभूल करत आहेत. हिंदूंमध्ये शौर्यतेज निर्माण करून हिंदवी स्वराज्य स्थापन करणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण ओक यांनी दिले नाही आणि कधी देणारही नाहीत; कारण गांधींनी हिंदूंच्या हिताची वाटमारी केली. ओक हेही त्याच मार्गाचे वाटमारे आहेत. गांधींची काळी कृत्ये रामराज्याकडे जाणारी नव्हती. त्यांनी पाकिस्तानची वाट प्रशस्त केली. एवढे करून भागले नाही; म्हणून फाळणीनंतरही हिंदूंसाठी असलेल्या भारताच्या भूभागातही मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे उपद्व्याप करून पुढच्या फाळणीची बीजेही रोवली. अशा गांधीजींचे उदाहरण देऊन ओक हेही हिंदूंना मुसलमानांच्या लांगूलचालनाच्या मार्गाने चालण्याचे आवाहन करत आहेत.
राम ज्याचा, रामराज्य त्याचे !
श्रीराम हे भक्ताचे आहेत. मग तो हिंदु असो, मुसलमान असो, ख्रिस्ती असो किंवा अन्य कोणत्याही पंथाचा असो. हे भक्तीचे साधेसोपे मर्म आहे. हिंदुत्वनिष्ठांना याचे चांगले ज्ञान आहे की, हिंदु धर्म हाच प्राणीमात्रांसह समस्त सृष्टीच्या कल्याणाचा विचार करणारा एकमेव धर्म आहे. अन्य पंथ तलवारीच्या हिंसेच्या बळावर मोठे झाले; परंतु तत्त्वज्ञानाच्या आधारे जगाने स्वीकारलेला एकमेव धर्म हिंदु आहे. हे ठाऊक असल्यामुळे हिंदूंनी कधी अन्य पंथियांवर हिंदु धर्म किंवा स्वत:ची दावते लादण्याचा प्रयत्न केला नाही; मात्र कुणी स्वखुशीने हिंदु धर्मानुसार आचरण किंवा श्रीरामांची आराधना केली, तर कधी कुणाला अटकाव केल्याचे एकतरी उदाहरण ओक यांनी दाखवावे. याउलट इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्या बळजोरीची उदाहरणे जगापुढे उघड आहेत. ‘रामराज्य म्हणजे केवळ हिंदूंचे राज्य’, ही ओक यांच्यासारख्या हिंदुत्वाविषयी द्वेष बाळगणार्यांच्या मनातील भीती आहे, दुसरे काही नाही. रामराज्य कसे असावे, हे सांगण्यासाठी हिंदु धर्मातील धर्मशास्त्राचे ज्ञाते समर्थ आहेत. ‘ज्याचा राम, त्याचे रामराज्य’, इतकी रामराज्याची संकल्पना सोपी आहे; परंतु ओक यांनी प्रथम मौलवी आणि पाद्री यांना भेटून त्यांना श्रीराम अन् रामराज्य मान्य आहे का ? हे विचारून यावे. ओक काहीही बरळले, तरी त्यांच्या वक्तव्यातून रामराज्यात कोण असावे ? आणि कोण नसावे ? यांविषयीची स्पष्टता मात्र प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाने करून घ्यावी.
| रावणाचा वध करून रामराज्याची स्थापना झाली आहे, तर यात गांधींच्या अहिंसेचे तत्त्वज्ञान येते कुठे ? |
संपादकीय : कथित स्त्रीवादाची रूपे !
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
संपादकीय : स्टार्मर यांचे काय चुकले ?
संपादकीय : ‘तेज’स कि मागास ?
संपादकीय : बांगलादेशी हिंदूंचे ‘जय श्रीराम’ !