|

मुंबई – कोरेगाव भीमा दंगल भडकवण्याचा आरोप असलेले देहली विद्यापिठातील प्राध्यापक हनी बाबू यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या याचिकेच्या संदर्भात गुणवत्तेच्या आधारे नव्हे, तर खटल्याविना दीर्घकाळ कारागृहात असल्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल, असे सांगत न्यायमूर्तींच्या खंडपिठाने निर्णय राखून ठेवला.
कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप बाबू यांच्यावर आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने वर्ष २०२० मध्ये त्यांना अटक केली होती.
2018 Koregaon Bhima riots : Decision on bail for urban Naxalite Hany Babu likely without trial
Bombay HC expected to decide “considering the long time spent in jail”
Babu has been in custody for over 5 years; his lawyers argue prolonged detention violates fundamental rights… pic.twitter.com/Dt2qinduYZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 5, 2025
बाबू यांच्या अधिवक्त्याने केलेला युक्तीवाद !
गेली ५ वर्षे २ महिने बाबू कारागृहात आहेत. त्यांच्याविरुद्ध अद्याप आरोपही निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला खटल्याविना कारागृहात ठेवणे, हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे हनन आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, असा युक्तीवाद बाबू यांच्या अधिवक्त्यांनी केला.
बाबू यांच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत. गंभीर गुन्ह्यांमध्ये केवळ दीर्घ कारावासाच्या आधारावर जामीन संमत करता येणार नाही, असा युक्तीवाद केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी केला आणि बाबू यांच्या जामिनाच्या याचिकेला विरोध केला.
संपादकीय भूमिकाहाच न्याय हिंदुत्वनिष्ठांच्या संदर्भातही लागू व्हावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! |
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !