ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची घोषणा

पुणे – पुढील वर्षी लता मंगेशकर यांच्या नावाने पुण्यातील ४० एकर परिसरामध्ये आशियातील सर्वांत मोठे रुग्णालय उभारण्यात येणार आहे, असे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले. लता मंगेशकर यांच्या ९६ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘मी लता दीनानाथ’ या लता दीदींच्या मराठी-हिंदी गीतांच्या सादरीकरणाच्या कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर बोलत होते.

मंगेशकर म्हणाले, ‘‘लतादीदींनी बाबांच्या कार्याचे स्मरण व्हावे; म्हणून ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ नावाचे रोपटे लावले. आता त्याचा मोठा विस्तार झाला आहे. त्यांच्या नावाने एक मोठे रुग्णालय उभारण्यात येईल. त्यात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्यात येतील.’’ मध्यंतरी मंगेशकर रुग्णालयावर अनेकांनी टीका केली. ती का केली ? हे कळले नाही; मात्र धनंजय कुलकर्णी यांनी समोर येत आमची बाजू मांडली, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
‘मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने यंदा प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, अभिनेत्री प्राजक्ता माळी, डॉ. धनंजय केळकर, पत्रकार सुशील कुलकर्णी यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे. हे पुरस्कार २४ एप्रिल २०२६ या दिवशी प्रदान करण्यात येणार असल्याचेही हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !