‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’च्या पारितोषिकांचे वितरण

मुंबई – महाराष्ट्राची परंपरा असेलल्या गणेशोत्सवाला राज्यशासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. सामाजिक सौहार्द, कला-संस्कृती यांचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाची व्यापकता येत्या काळात राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवण्यासाठी प्रयत्न करू, असे वक्तव्य राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी केले. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’च्या राज्य आणि जिल्हा स्तरीय पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम २५ सप्टेंबर या दिवशी पार पडला. या वेळी आशिष शेलार यांनी वरील वक्तव्य केले. मुंबईतील चित्रनगरी, गोरेगाव गणेशोत्सव मंडळाने प्राप्त केलेली पारितोषिकाची रक्कम ‘मुख्यमंत्री साहाय्य निधी’स देत असल्याचेही या वेळी शेलार यांनी घोषित केले.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !