प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणात उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांची चेतावणी

डेहराडून (उत्तराखंड) – राज्यात कुठल्याही परिस्थितीत ‘कॉपी जिहाद’ सहन केला जाणार नाही. युवकांच्या भविष्याशी छेडछाड करणार्यांना सरकार मुळापासून संपवल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही, अशी चेतावणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. या प्रकरणात नुकतेच पोलिसांनी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणार्या शाहीद आणि सदिया या दोघांना अटक केली आहे.
मुख्यमंत्री धामी पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने कॉपी माफियांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा लागू केला आहे. यामुळे २५ सहस्रांहून अधिक युवकांना सरकारी नोकर्यांची संधी मिळाली आहे आणि वर्ष २०२२ पासून आजवर १०० हून अधिक कॉपी माफियांना कारागृहात डांबण्यात आले आहे. तरीसुद्धा काही जण संघटित पद्धतीने परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्याचे षड्यंत्र रचत आहेत. शिकवणी वर्गांचे (कोचिंग क्लासेसचे) आणि कॉपी माफियांचे संगनमत यांमुळे युवकांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. त्यामुळे सरकार त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करेल.
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक