
मुंबई – मासेमारांसाठी स्थापन करण्यात येत असलेले महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ या दोन्ही महामंडळांच्या स्थापना प्रक्रियेला गती द्यावी. मासेमारांच्या विविध समस्या या महामंडळांच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहेत. त्यामुळे याला प्राधान्य द्यावे. सप्टेंबर मासाच्या अखेरपर्यंत ही दोन्ही महामंडळे स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत. अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी आराखडा सिद्ध करा, तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करणार्या मासेमारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करून महिना अखेरपर्यंत हे महामंडळ स्थापन करावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी येथे दिल्या.
२४ सप्टेंबर या दिवशी मंत्रालयात झालेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या आढावा बैठकीत मंत्री राणे बोलत होते. या वेळी मत्स्य व्यवसाय सचिव एन्. रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अतीवृष्टीमुळे मासेमारांच्या झालेल्या हानीचा आढावा घेण्याचा आदेश
मुंबई – मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत पूरस्थिती निर्माण होऊन मासेमारांची मोठी हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. संबंधित अधिकार्यांना सर्वेक्षण करून हानीची नोंद करण्याचे, तसेच राज्यातील सर्व तलावांचे सर्वेक्षण करून गाळ किती साचला आहे, याची माहिती सादर करण्याचा आदेश मंत्री राणे यांनी दिला. ‘तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम पुढील काही दिवसांत राबवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पुढील वर्षी पुन्हा गाळ साचल्याने तलाव भरून वाहण्याचा (ओव्हरफ्लो) होण्याचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे’, असे मंत्री राणे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा