श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीस उत्साहात प्रारंभ !

सांगली, २२ सप्टेंबर (वार्ता.) – देशासाठी सर्व तरुण आणि तरुणी यांनी कार्य केले पाहिजे. देव, धर्म आणि राष्ट्र यांसाठी तरुण अन् तरुणी यांनी वेळ दिला पाहिजे. आपल्याला जन्माला घालणारी माता, जिजामाता, देशमाता, भारतमाता, दुर्गामाता आणि कालीमाता अशा मातांचे रूप एकच आहे. या मातांचे आपल्यावर अनेक उपकार आहेत. हिंदूंनी त्यांचे ऋण फेडले पाहिजेत. जिजाऊमाता यांनी नवरात्रीत स्वत:साठी काही न मागता आसेतुहिमाचल भगव्या ध्वजाचे राज्य उत्पन्न करणार्या पुत्राची मागणी केली. तरुण आणि तरुणी यांनी तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून स्वातंत्र्याची, तसेच राष्ट्र अन् धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य श्री दुर्गामातेजवळ मागावे, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. २२ सप्टेंबर या दिवशी ते श्री दुर्गामाता दौडीच्यापहिल्या दिवशी माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर बोलत होते.

३५ वर्षांहून अधिक काळ ही दौड चालू आहे. प्रथम मारुति मंदिरासमोर असलेल्या शिवतीर्थावर सर्व धारकरी एकत्र आले. येथे सांगली अर्बन अधिकोषाचे अध्यक्ष श्री. गणेशकाका गाडगीळ यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. या वेळी भगव्या ध्वजाला माता-भगिनींनी ओवाळले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री हणमंतराव पवार, सचिन जाधव, मोहनसिंह रजपूत, मिलिंद तानवडे, अविनाश जाधव, राजू पुजारी, संतोष लोखंडे, प्रफुल्ल चव्हाण, हरिदास कालिदास, राहुल आनंदे, जगदीश जुमनाळ, राहुल बोळाज, अंकुश जाधव, सचिन पवार यांसह मोठ्या संख्येने अन्य धारकरी उपस्थित होते. ध्वजपूजेनंतर सर्व धारकरी दौड करत माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिराकडे गेले. येथे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शन झाले. यानंतर शहरातील वखारभाग, सांगली कॉलेज कॉर्नर, स्टेशन रोड अशा विविध मार्गांवरून जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ दौडीचा समारोप झाला.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू