पुढील ५ दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस !
मुंबई – राज्यात पुढील ५ दिवसांत मुसळधार पावसाची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूरसह मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.
महिलेचा मद्यपीकडून भर रस्त्यात विनयभंग !
ठाणे – डोंबिवली रेल्वेस्थानक भागात गजरा विक्री करणार्या ४५ वर्षीय महिलेचा येथील सिद्धार्थनगर भागातील श्रीकेश चौबे (वय ४६ वर्षे) याने दारूच्या नशेत विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने रामनगर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून चौबेविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिका : असुरक्षित डोंबिवली शहर !
परीक्षा शुल्कवाढीच्या विरोधात आंदोलन !
पुणे – येथील सावित्रीबाई फुले विद्यापिठाने परीक्षा शुल्कात केलेल्या २० टक्के वाढीच्या विरोधात ‘नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया’च्या (‘एन्.एस्.यू.आय.’च्या) वतीने परीक्षा विभागासमोर आंदोलन करण्यात आले. परीक्षा शुल्क वाढवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीच्या विरोधात आहे. हा निर्णय विद्यापिठाने रहित करावा, असे निवेदन परीक्षा विभागाला देण्यात आले. (शुल्कवाढीच्या विरोधात आंदोलन का करावे लागते ? विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन विद्यापीठ निर्णय घेणार का ? – संपादक)

खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन