‘१२.९.२०२५ या दिवशी आम्ही हरवळे (गोवा) येथे महालय श्राद्धविधी केला. तेव्हा पितरांना अन्न ठेवण्यात आले. त्या वेळी प्रथम एका कावळ्याने त्यातील थोडे अन्न ग्रहण केले. त्यानंतर तेथे एक चिमणी येऊन तिने ते अन्न ग्रहण केले. पितरांना दिलेले अन्न चिमणीने ग्रहण करण्याच्या संदर्भात मला सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. काही पितर त्यांच्यासाठी ठेवलेले अन्न
कावळ्याऐवजी चिमणीद्वारे ग्रहण करत असण्याचे कारण
अ. आईच्या गर्भात मृत्यू झालेल्या मुलीचा लिंगदेह.
आ. १ ते १२ वर्षांपर्यंत मृत्यू झालेल्या मुलीचा लिंगदेह.
इ. विवाहानंतर अल्प कालावधीत पतीचे निधन झाल्याने पुष्कळ दुःखी झालेल्या विधवा स्त्रीचा लिंगदेह.
असे पितर ‘पुढील गती मिळणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी श्राद्धाच्या वेळी ठेवलेले अन्न प्राप्त करणे’, यांसाठी प्रथम ते कावळ्याच्या शरिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्या पितरांच्या तुलनेत कावळ्याची शक्ती अधिक असल्यास त्यांना कावळ्याच्या शरिरात प्रवेश करता येत नाही.
त्यानंतर असे पितर चिमणीच्या शरिरात प्रवेश करतात; कारण चिमणीची शक्ती कावळ्याच्या तुलनेत अल्प असते. त्यामुळे काही पितर चिमणीद्वारे श्राद्धाच्या वेळी त्यांच्यासाठी ठेवलेले अन्न ग्रहण करून तृप्त होतात. त्यानंतर त्या पितरांना पुढील गती मिळण्यास साहाय्य होते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक, वेळ आणि एकूण कालावधी : १९.९.२०२५, सकाळी १०.३०, ५ सेकंद)
|
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !