श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना त्यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा !

‘चैतन्याच्या स्तरावर कार्य कसे होत असते’, याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या मूर्तीमंत उदाहरण आहेत’, असे मी गेल्या वर्षी त्यांच्या संदर्भात म्हटले होते. याची प्रचीती यंदा माझ्या जन्मोत्सवानिमित्त ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करतांना सर्वच साधकांना आली. एवढा मोठा सोहळा सनातनच्या इतिहासात पहिल्यांदाच होत होता. महोत्सवासाठीच्या विविध सेवांचे दायित्व साधक सांभाळणार असले, तरी साधनेच्या स्तरावर त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हे दायित्व लीलया पार पाडले. महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने होणार्या विविध बैठकांना उपस्थित राहून त्यांनी साधक आणि अन्य संघटनांचे प्रतिनिधी यांच्याकडून अनेक गोष्टी जाणून घेतल्या. यातून त्यांची शिष्यभावात राहून इतरांकडून शिकण्याची वृत्ती दिसून आली. सर्व साधकांना त्यांचा आधार वाटत होता आणि त्यांच्या उपस्थितीमुळे साधकांचा आत्मविश्वासही द्विगुणित झाला होता.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती’ यांविषयीचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले लिखाण वाचतांना साधकांसह समाजातील धर्मप्रेमींनाही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी स्थूल अन् सूक्ष्म स्तरावर अनुभूती आल्याचे लक्षात येते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील व्यापकत्व आता वाढत आहे. केवळ साधकच नाही, तर समाजातील व्यक्तींनाही त्यांचे दिव्यत्व जाणवत आहे.
त्यांच्याकडून चैतन्याच्या स्तरावर आपोआप कार्य होत आहे आणि स्थुलातून भक्तीसत्संगाद्वारे त्या साधकांचे स्वभावदोष निर्मूलन व्हावे अन् त्यांची भक्ती वाढावी, यांसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्या साधकांचा साधनेतील आधारस्तंभ बनल्या आहेत. साधकांना घडवण्याचा आणि जिज्ञासूंना सनातन संस्थेशी जोडण्याचा वारसा त्या समर्थपणे पुढे चालवत आहेत. सनातनचे वटवृक्षाप्रमाणे वाढणारे सध्याचे कार्य पहाता माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी मला दिलेल्या ‘सनातनचे कार्य देश-विदेशांत पोचेल’, या आशीर्वादाची प्रचीती येते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून हे कार्य उत्तरोत्तर वाढत आहे. साधकांनी त्यांच्या चैतन्यदायी सत्संगाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ करून घ्यावा !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !
शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !
अध्यात्माचे अनंतत्त्व !