अध्यात्माचे अनंतत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘या भूतलावर अध्यात्माच्या संदर्भात अनेक ग्रंथ आहेत. या ग्रंथांमधील ज्ञान संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त असे आहे; पण यातील काही ज्ञान सर्वसामान्यांना कळणे कठीण आहे. त्यामुळे त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ होत नाही. यासाठी वाटत होते की, यातील आवश्यक ते ज्ञान निवडून त्यांचे सोप्या भाषेतील ग्रंथ करावेत, जेणेकरून त्याचा सर्वांना लाभ होईल. त्यासाठी गेले ४० वर्षे मी सहस्रो ग्रंथांतील लिखाण निवडले. त्यांतील काही ज्ञान ३७० हून अधिक ग्रंथांतून प्रकाशितही झाले आहे.

पुढे लक्षात आले की, या ग्रंथांची व्याप्ती इतकी आहे की, ते कार्य एका जन्मात होण्यासारखे नाही. त्यामुळे काही वेळा ‘मोक्षाला न जाता केवळ मानवजातीसाठी उपयुक्त ग्रंथ लिखाणासाठी पुनःपुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटायचे किंवा ‘देवा, आध्यात्मिक ग्रंथांतील मजकूर निवडण्यासाठी मला खूप जन्म दे’, अशी प्रार्थना करावी, असाही विचार येत असे; पण हे अनंताचे ज्ञान आहे. हे कार्य पुढच्या-पुढच्या पिढ्यांमध्ये सुरूच राहील !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२०.५.२०२६)