शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !

‘नर्दुल्ला टँक मैदान, प्रभादेवी, मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने १७ मे २०२६ या दिवशी ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ दिव्य वातावरणात पार पडला. या महायज्ञाच्या पूर्वसिद्धतेच्या सेवेत असलेले श्री. विष्णु जाधव यांची साधकाच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सेवा समयमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सेवांचा प्राधान्यक्रम ठरवून देणे 

नर्दुल्ला टँक मैदान येथे महायज्ञासाठी भव्य मंडप उभारण्यात येत होता. श्री. विष्णु जाधवकाका हे कार्यस्थळ निर्मितीच्या सेवेत होते. ते सांगत असलेल्या सूत्रांमुळे सेवा योग्य प्रकारे होण्यासाठी साधकांना दिशा मिळाली. ‘सेवा समयमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कोणत्या कृती प्राधान्याने करायला हव्यात’, याचे मार्गदर्शन जाधवकाकांनी वेळोवेळी केले. त्यामुळे सेवा गतीने पूर्ण होण्यास साहाय्य झाले.

श्री. विष्णुपंत जाधव

२. कंत्राटदाराला सेवा समयमर्यादेत करण्यासाठी उद्युक्त करणे

कंत्राटदाराकडून अनेक गोष्टी करून घ्यायच्या होत्या. जाधवकाकांनी कंत्राटदाराला समयमर्यादेत सेवा करण्यासाठी उद्युक्त केले. जाधवकाकांनी कंत्राटदाराकडून सेवा वेळेत पूर्ण करून घेतल्या.

३. साधकांचा विचार करणे 

उन्हात सेवा करणार्‍या साधकांना ‘उन्हाचा त्रास होऊ नये’, यासाठी त्यांना ‘पाणी, सरबत त्याचप्रमाणे ‘ओ.आर्.एस्.’ (टीप) हे देण्याची व्यवस्था कशा प्रकारे हवी ?’, याविषयी जाधवकाकांनी सुचवले.

(ओ.आर्.एस्. – जलसंजीवनी. उन्हात काम केल्यास शरिरातील पाणी आणि इतर महत्त्वाचे घटक यांचे प्रमाण न्यून होते. तेव्हा ते भरून काढण्यासाठी ‘ओ.आर्.एस्.’ हे मिश्रण देण्यात येते.)

श्री. बळवंत पाठक

४. शांत आणि स्थिर राहून अडचणींवर मात करणे 

काही वेळा साधक सेवा करत असतांना अडचणी येत असत. तेव्हा जाधवकाका शांत आणि स्थिर राहून प्रसंग हाताळत असत. त्यांचे स्मितहास्य पाहून साधकांना सेवा करण्यासाठी उत्साह वाटत असे.

५. जाधवकाका नेहमी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असतात.’

– श्री. बळवंत पाठक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे), मुंबई (२०.५.२०२६)