
पुणे – वाहतूककोंडी होणार्या शहरात पुणे जगात चौथ्या क्रमांकावर आहे. पुण्यात १० कि.मी. अंतर जाण्यासाठी ३३ मिनिटे लागतात. त्यामुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी नागरिकांना नियोजित वेळेच्या १ घंटा पूर्वी घराबाहेर पडावे लागते. याचा नागरिकांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत; पण रस्त्यावर पडलेले खड्डे, ओबडधोबड ‘पॅचवर्क’ (खड्डयात खडी आणि डांबर टाकून रस्ता दुरुस्ती करणे), हातगाडी, पथारी, रस्त्यावरील दुकाने, पादचारी मार्गावर झालेली अतिक्रमणे, अवैध बांधकामे यांमुळे परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. शहरातील ३२ प्रमुख रस्ते आणि २२ चौक या ठिकाणी वाहतूककोंडी का होत आहे ? याची कारणे शोधून, २२ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर शर्मा यांनी महापालिका प्रशासनातील सर्व विभागांना दिले आहेत.
ही माहिती संकलित करून पुढील बैठकीत चर्चा करून उपाययोजना करण्यात येणार आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात