
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडून ‘विचारण्याची वृत्ती कशी असावी ?’, याविषयी मला अनेकदा शिकायला मिळाले. त्यांना ‘एखादी सेवा करतांना साधनेच्या स्तरावर कसा दृष्टीकोन ठेवायचा ?’, असे विचारले, तर त्या संबंधित सेवेचा पूर्ण अभ्यास जाणून घेतात. अन्य कुणा साधकाला त्या क्षेत्रातील माहिती असेल, तर ती त्याला विचारून घेतात. त्या आध्यात्मिक स्तरावर विचार करतात आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास परिपूर्ण असतो. बर्याच वेळा आम्ही केलेल्या अभ्यासातील उणिवा त्यांच्या लगेच लक्षात येतात. त्यांच्यामध्ये ‘विचारण्याची वृत्ती, शिकण्याची वृत्ती आणि अखंड शिष्यत्व’ असल्याने त्या कोणत्याही विषयावर मार्गदर्शन करू शकतात. ‘त्यांच्यात अहं किती अल्प आहे’, हे सतत लक्षात येते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा विचारण्याचा भाग केवळ काही सूत्रांपुरताच मर्यादित नाही, तर सत्संग झाल्यावरसुद्धा त्या सहजपणे ‘माझे काही चुकले असेल, तर सांगा, माझ्या सांगण्यात काही राहिले असेल, तरीही मोकळेपणाने सांगा’ किंवा ‘तुम्ही मला जे सांगितले, ते समजून घेण्यात मी न्यून पडले असेन, तर तेही सांगा’, असे सांगतात. त्यांचे असे विचारणे, हे ठराविक सूत्रांसाठी नसून ‘त्या सतत विचारण्याच्या स्थितीमध्येच असतात’, असे जाणवते.
– श्री. मेहूल राऊत, पाटणतळी, फोंडा, गोवा. (३.९.२०२५)
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !
शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !
अध्यात्माचे अनंतत्त्व !