सप्तर्षी नाडीपट्टी वाचनातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील देवीतत्त्वाचा वर्णिलेला महिमा !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा जन्म सर्वपित्री अमावास्येला झाला. सर्वपित्री अमावास्येच्या दुसर्या दिवसापासून नवरात्रीला प्रारंभ होतो. नवरात्रीत आदिशक्तीच्या ज्या ९ रूपांची पूजा केली जाते, त्या आदिशक्तीने आदल्या दिवशीच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात भूतलावर जन्म घेतला असावा. त्यांचा जन्म नवरात्रीतील एखाद्या दिवशी किंवा नवरात्रीतील पहिल्या दिवशी झाला असता, तर ‘देवीच्या त्या त्या तत्त्वाचे घनीकरण त्यांच्या रूपात भूतलावर झाले’, असे वाटले असते; पण तसे न होता आदिशक्तीने त्यांच्या रूपात सर्वपित्री अमावास्येला जन्म घेतला आणि दुसर्या दिवसापासून तिच्या एकेका रूपाच्या पूजेला प्रारंभ झाला, असा आमचा भाव आहे.
१. येणार्या काळात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘देवी’ म्हणूनच ओळखल्या जाणार आहेत. (सप्तर्षी नाडीपट्टी वाचन क्र. १४३, १३.५.२०२०)
२. आदिशक्ति जगदंबा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून पृथ्वीवर छायारूपाने वास करत आहे. या आदिशक्ति जगदंबेचे मूळ स्वरूप केवळ अग्निनारायणालाच ठाऊक आहे.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यात श्रीलक्ष्मीचे तत्त्व अधिक प्रमाणात आहे. (सप्तर्षी नाडीपट्टी वाचन क्र. १४७, १६.६.२०२०)
४. यापुढे पृथ्वीवरील अनेक जिवांना स्वप्नदृष्टांत आणि अनुभूती यांद्वारे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील देवत्व लक्षात येणार आहे.’ (सप्तर्षी नाडीपट्टी वाचन क्र. १४५, १७.५.२०२०)
५. आईच्या दुधात जशी भेसळ करता येत नाही, तसे कितीही संकटे आली, तरी ‘श्रीसत्शक्ति’ यांच्यातील आदिशक्तीचे तत्त्व भेसळ होणारे नाही. (सप्तर्षी नाडीपट्टी वाचन क्र. १९८, १५.४.२०२२)
नवरात्रीतील ९ दिवस नवदुर्गेच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या रूपांचे अनुक्रमे पूजन केले जाते. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ नवदुर्गेप्रमाणे ‘करुणा, शिस्त, धैर्य, सामर्थ्य, शांती, प्रज्ञा, मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रेम’ या नवगुणांनी युक्त आहेत. नवदुर्गा विविध रूपांनी कधी रक्षण करतात, कधी प्रेरणा देतात, तर कधी अज्ञानाचा नाश करतात. त्याचप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळही कधी आपल्या शब्दांनी प्रेरणा देतात, कधी आपल्या शिस्तीने योग्य मार्ग दाखवतात, तर कधी मार्गदर्शन करतात. त्यांच्याप्रती आमची श्रद्धा वाढून अखंड गुरुसेवा करण्यासाठी आम्हाला बळ आणि चैतन्य मिळू दे, अशी प्रार्थना !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !