काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार बसवराज रायरेड्डी यांचे हिंदुद्वेषी वक्तव्य

बेंगळुरु – कर्नाटकात जातीनिहाय जनगणनेत धर्म आणि जात नोंदवण्याच्या संदर्भात जोरदार चर्चा होत आहे. या संबंधी काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आर्थिक सल्लागार बसवराज रायरेड्डी यांनी ‘मी माझा धर्म ‘हिंदु’ असा लिहीत नाही. हिंदु हा धर्मच नाही’, असे विधान केले. जातीनिहाय जनगणनेत ‘धर्म’ या रकान्यात काय नोंदवावे ?, यावर बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.
🚨 Karnataka Caste Census Row
Congress leader & CM’s advisor Basavaraj Rayareddy:
👉 “I don’t write my religion as Hindu; Hindu is not a religion, only a culture. If asked, I’ll write ‘no religion.’”🚫 Only birth-Hindus make such anti-Hindu claims. Has any Muslim or Christian… pic.twitter.com/4MWfOvLWtc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 20, 2025
बसवराज रायरेड्डी पुढे म्हणाले की, लिंगायत आणि हिंदु धर्म असे काहीच नाही. हिंदु ही केवळ एक संस्कृती आहे. ती शरण तत्त्व आणि लिंगायत तत्त्व यांवर आधारित चळवळ आहे. वीरशैव आणि लिंगायत यांच्यातच गोंधळ आहे. जर कुणी माझा धर्म कोणता ? असे विचारले, तर मी ‘माझा कोणताही धर्म नाही’, असे लिहीन. हा माझा वैयक्तिक विचार आहे. ‘माझ्या पत्नीने लिहिले, तर मी काही सांगू शकत नाही’, असेही ते म्हणाले.
जातीनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाने ‘धर्म’ या रकान्यात ‘लिंगायत’ असे लिहिण्याचे आवाहन केले आहे, तर ‘हिंदु’ असे लिहिण्याचे आवाहन ‘पंचमसाली जनजागरण सभे’ने केले आहे.
संपादकीय भूमिकाज्यांना हिंदु धर्माचे ज्ञान नाही, तसेच त्याचे महत्त्व ठाऊक नाही, असे जन्महिंदूच अशी हिंदुद्वेषी वक्तव्ये करू शकतात. एक तरी मुसलमान किंवा ख्रिस्ती कधी त्यांच्या धर्माविषयी असे वक्तव्य करतात का ? |
संपादकीय : मनसुबे उघड !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित