
सातारा, १९ सप्टेंबर (वार्ता.) – वर्ष २०२४ मध्ये ‘नीट पीजी’ (पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा) यांमधून प्रवेश घेतलेल्या २६५ निवासी डॉक्टरांचे ६ महिन्यांपासून थकित असलेले वेतन तातडीने दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीला शासनाने यापूर्वी स्थगिती दिली होती; मात्र न्यायालयाने ती उठवल्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रियेतूनच निर्णय घेतला जाणार आहे. निवासी डॉक्टरांचे ६ महिन्यांपासून थकित असलेले वेतन तातडीने दिले जाईल. यासाठी सर्वाेच्च प्राधान्य दिले जाणार आहे.’’
अहंकार कि सत्याचा शोध ?
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश