श्राद्धपक्षाच्या निमित्ताने…
पितरांप्रती आदर व्यक्त करण्याच्या प्रथा तर सगळ्याच धर्मांमध्ये आहेत आणि त्या त्या धर्मातील बहुतेक सर्वजण त्या पाळतात; पण याची थट्टा, टवाळी केवळ हिंदु धर्मातच होते. पितृपक्ष आला की, गोंधळात टाकणारे लेख पुनःपुन्हा येऊ लागतात. माध्यमांमधून हिंदु धर्माच्या टवाळक्या चालू होतात. त्याच्या खुलाशासाठी काही सूत्रांची माहिती येथे दिली आहे.
उत्सुकतेपोटी केलेला माझा या विषयाचा थोडा अभ्यास, काही चांगल्या जाणकारांचे मार्गदर्शन, स्वतःला आलेले अनेक अनुभव यांवरून अनेक निष्कर्ष काढता आले आणि ते माझ्या अनेक प्रश्नांना अन् शंकांना बरेचसे अचूक उत्तर देणारे आहेत. यासंबंधीच्या लेखाचा काही भाग आपण १७ सप्टेंबर या दिवशी वाचला. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा यापूर्वीचा भाग वाचण्या करिता येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/957404.html

१५. आताच्या युगात सर्व संदर्भ, व्यवहार, दैनंदिन आयुष्य असे सगळेच पुष्कळ पालटले आहे. लाखो ब्राह्मणांनी गेल्या काही पिढ्यांपासून स्वतःचे व्यवसाय पालटले. दान घेणे (प्रतिग्रह) बंद केले असून आता ते दान, देणग्या देऊ लागले आहेत. त्यामुळे या कामामध्ये प्रशिक्षित असलेल्या ब्राह्मणांना त्याचा मोबदला म्हणून जरूर दान करावे.
१६. मनुष्य जन्मात आत्म्याच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात. जिवंतपणी धन, पैसा, स्थावर, कपडे, सोनेनाणे अशा जड रूपातील वस्तू, म्हणजे त्याच्या देहाची आवश्यकता असते. मृत्यूनंतर हे सर्व तो येथेच सोडून गेलेला असतो; पण आपल्या श्रद्धेनुसार आत्मा मात्र हा अन्नाच्या गंध किंवा वासामुळे तृप्त होतो; म्हणूनच त्याला अन्न अर्पण करण्याला महत्त्व दिलेले आहे. गंध या कारणामुळे श्राद्धामध्ये अत्यंत उत्तम सुगंध असलेली फुले, चंदन, उदबत्त्या वापरल्या जातात.
१७. ‘मेटा सायन्स’चे जॉर्ज मिक यांनी लिहिलेले ‘आफ्टर वुई डाय व्हॉट देन ?’ या नावाचे एक पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद (‘मृत्यूनंतर होते तरी काय ?’ अनुवाद : पद्मा कुलकर्णी) पुण्याच्या ‘प्रसाद प्रकाशन’ने प्रसिद्ध केला आहे. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे. यात नावानिशी माहिती, आत्म्याची छायाचित्रेही दिली आहेत. त्यात हिंदु तत्त्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नाही, तरी त्यांचे सर्व निष्कर्ष मात्र हिंदु धर्मातील याविषयीची सर्वच्या सर्व अनुमाने खरी आहेत यावर शिक्कामोर्तब करतात. ज्या ख्रिस्ती धर्मात पुनर्जन्मच नाही, तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ ‘पुनर्जन्म’ या विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत.
१८. जातपात, राजकीय मते, पुरोगामी आणि अतीवैज्ञानिक विचार अशा गोष्टी क्षणभर बाजूला ठेवून आपण शांतपणे हिंदु धर्माविषयी एक विचार करूया ! या देशात, या धर्मात सहस्रो वर्षे आणि आजवर आपले कोट्यवधी पूर्वज जे काही करत होते, ते सर्व मागासलेले अन् त्या अंधश्रद्धा होत्या का ? ते सर्वच मूर्ख होते का ? सहस्रो वर्षांत त्यांच्यामध्ये कुणीही पुरोगामी किंवा वैज्ञानिक विचारांचा उपजलाच नाही कसा ?
१९. स्मशान हे हिंदु धर्मात भगवान शंकराचे, भैरवांचे स्थान मानले गेले आहे. तेथे जाऊन मेजवानी करणे, केक कापणे हे हिंदूंना हिणवण्यासाठी केले जाते; पण कुणाचीही कुठल्या कब्रस्तानात जाऊन मेजवानी करण्याचे धाडस होणार नाही. याउलट अनेक परधर्मीय विदेशी मंडळी मात्र आपल्या या धर्मशास्त्राकडे आकर्षित होत आहेत. ते भारतात येऊन श्राद्ध करतात. रशिया, कझाकिस्तान, स्वित्झर्लंड येथील महिलांनी गया येथे येऊन श्राद्ध केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. ५-६ वर्षांपूर्वी तोमोका मुशिगा या जपानी महिलेले हिंदु श्राद्ध पद्धतीवर संशोधन करून ‘डॉक्टरेट’ (विद्यावाचस्पती) पूर्ण केली आहे. या विषयावरील तिचे अनेक लेख आंतरराष्ट्रीय ‘जर्नल्स’नी प्रसिद्ध केले आहेत.
२०. जगातील अनेक प्रमुख धर्मांमध्ये मृत्यूनंतर देह पुरला जातो. त्यामुळे त्याचे स्मरणविधी हे त्याच्या कबरीजवळ जाऊन करण्याची पद्धत आहे. तथापि हिंदु धर्मामध्ये मृत्यूनंतर देह हा अस्तित्वातच रहात नसल्यामुळे हिंदु व्यक्ती तिच्या पितरांचे श्राद्ध स्वतःच्या रहात्या घरामध्ये किंवा कुठेही करू शकते. इतकेच नव्हे, तर या श्राद्धाला किमान ३ पिढ्यांची नावे घेऊन स्मरण केले जाते. कुटुंबातील अन्य मृत व्यक्तींची नावे माहिती नसली, तरीही त्यांना आवाहन आणि निमंत्रित करून श्राद्ध केले जाते.
या संपूर्ण विषयावर आपल्याकडे अत्यंत सुसंगत सिद्धांत, अनेक ग्रंथ उपलब्ध असूनही त्यावर संशोधन होत नाही. शेकडो वर्षे आपल्यावर राज्य करणार्या आक्रमकांनी आपल्यात न्यूनगंड पेरला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी अवैज्ञानिक, अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात. ‘ज्याचे पुरावे आपल्याला सापडले नाहीत किंवा शोधता आलेले नाहीत, त्या गोष्टीच असू शकत नाहीत’, असे आपल्याला म्हणता येणार नाही, हे सर्वांत महत्त्वाचे आहे.
श्राद्ध करावे कि नाही ? श्रद्धा कुठली ? आणि विज्ञान कुठले ? हे ज्याचे त्याने ठरवावे. आपल्या हिंदु धर्मातील या एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची नीट माहिती करून घ्यावी. त्यानंतर आजच्या काळाशी सुसंगत असे काय करावे ? हे प्रत्येकाने आपल्या सारासार विवेकानुसारच ठरवावे. त्याला तसे स्वातंत्र्य दिलेले आहे. (समाप्त)
– श्री. मकरंद करंदीकर, ठाणे
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?