
पुणे, १६ सप्टेंबर (वार्ता.) – ‘यूथ फॉर पनून कश्मीर’च्या कार्यकर्त्यांनी त्यांची मातृभूमी परत मिळवण्याच्या अढळ संकल्पाने आणि अनेक दशके निर्वासित झाल्याच्या जाणिवेतून शक्ती मिळवून ‘हिंदु बलीदान दिवस’ साजरा केला. पुणे येथे १४ सप्टेंबर या दिवशी झालेल्या कार्यक्रमात निर्वासित झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या तिसर्या पिढीतील या तरुणांनी असामान्य दृढ निश्चय आणि कार्यासाठी वचनबद्धता दर्शवली. या कार्यक्रमाला पूजनीय स्वामी कुमार, ‘काश्मिरी हिंदु सभे’चे अध्यक्ष श्री. आर्.पी. राजदान, ‘भारत भारती संघटने’चे नेतृत्व करणारे श्री. समीर पंड्या, हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर, पुणे स्थित अनेक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात हुताम्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीप प्रज्वलित करण्यात आले.
या वेळी ‘kashmiripanditmartyrs.com’ या संकेतस्थळाचे अनावरणही करण्यात आले. ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे नेते सर्वश्री राहुल कौल, रोहित भट, राजेश कचरू यांनी उपस्थितांना संबोधित केले. सुरक्षित आणि प्रतिष्ठित मातृभूमीच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. या कार्यक्रमाच्या समवेतच ‘यूथ फॉर पनून कश्मीर’च्या कार्यकर्त्यांनी भारतातील जगती, नागरोटा, मुठी, पूरखू, नोएडा, फरिदाबाद आणि गाझियाबाद या ठिकाणी एकात्मतेच्या भावनेने पाणी वितरण मोहीम राबवली.


राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची ‘लेट्सअप न्यूज पोर्टल’कडून मानहानी