पंतप्रधान मोदी यांनी मणीपूरमधील हिंसाचारग्रस्त चुराचंदपूरला दिली भेट !

इंफाळ (मणीपूर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पूर्वाेत्तर भारताच्या ३ दिवसांच्या दौर्यावर आहेत. २ वर्षांपूर्वी ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी हिंदु मैतेयींवर आक्रमण केलेल्या चुराचंदपूरलाही पंतप्रधानांनी भेट दिली. हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या विस्थापित लोकांना पंतप्रधान भेटले. पंतप्रधान म्हणाले की, संवाद, आदर आणि परस्पर समंजसपणा, यांना महत्त्व देऊन शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले जात आहे. मी सर्व संघटनांना शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन करतो.
पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !
१. मणीपूरची ही धैर्य आणि शौर्य यांची भूमी आहे. या टेकड्या निसर्गाची एक मौल्यवान देणगी आहे. मणीपूरच्या नावातच मणी असून हाच मणी येणार्या काळात संपूर्ण ईशान्य भागाची चमक वाढवणार आहे.
२. एक काळ असा होता, जेव्हा देहलीत घेतलेले निर्णय येथे पोचण्यासाठी दशके लागायची. आज आपले चुराचंदपूर, आपले मणीपूर, देशाच्या इतर भागांसह प्रगती करत आहे.
३. सरकारने मणीपूरमध्ये ७ सहस्र ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक