ओडिशामध्ये तहसीलदाराला १५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !

अश्विनी पांडा

भुवनेश्वर – ओडिशामधील संबलपूर जिल्ह्यातील बामरा येथे तहसीलदार अश्विनी पांडा याला १२ सप्टेंबर या दिवशी राज्य दक्षता विभागाच्या अधिकार्‍यांनी १५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले. तहसीलदाराने शेतभूमीचा तुकडा गृहभूमीत रूपांतरित करण्यासाठी रक्कम मागितली होती. तहसीलदार अश्विनी पांडा याने वर्ष २०१९ मध्ये ओडिशा नागरी सेवा परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला होता.

पांडा व्यतिरिक्त राज्य दक्षता पथकाने आणखी २ अधिकार्‍यांना अटक केली आहे. नयागड जिल्हा कामगार अधिकारी चित्तरंजन राऊत याला एका कामगाराकडून त्याच्यासह १९ गरीब कामगारांना कामगारकार्ड देण्यासाठी ६ सहस्र रुपये लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. मयूरभंज जिल्ह्यातील पंचायत कार्यकारी अधिकारी पुष्पिता महाकुड याला निधीच्या गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

प्रशासनात असे लाचखोर अधिकारी असल्यास ते जनहित काय साधणार ?