
‘जेव्हा आपण व्यायाम करतो, तेव्हा आपल्या मनाची स्थिती आणि एकाग्रता फार महत्त्वाची असते. व्यायामाच्या वेळी ‘इतर विचार, कामाचा तणाव, कार्यालयातील तंटे, घरातील भांडणे’ इत्यादींचा विचार केल्यास व्यायामाची फलनिष्पत्ती न्यून होऊन शरिराला होणारा लाभ उणावतो. याउलट व्यायामाच्या वेळी जाणवत असलेल्या आल्हाददायक अनुभवांकडे सकारात्मक राहून लक्ष दिल्यास व्यायाम अधिक गुणात्मक होतो, तसेच ‘शारीरिक क्षमता वाढणे, कामाची गती वाढणे, मनावरील तणाव न्यून होणे’, असे अनेक लाभ जाणवतात. सकारात्मकतेमुळे आपले शरिराविषयीचे गांभीर्य टिकून रहाते. आपण सकारात्मक आणि प्रयत्नशील राहिल्यास आपोआपच अडचणींतून मार्ग काढून आपली कर्तव्ये पार पाडणे सोपे जाते.’
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा.
गुरुपौर्णिमेला ९ दिवस शिल्लक
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !
गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक