चिथावणीखोर भाषण केल्याचा पोलिसांचा आरोप

मंड्या (कर्नाटक) – मद्दुरू येथे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली कर्नाटकातील हिंदुद्वेषी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री सी.टी. रवि यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सी.टी. रवि यांनी त्यांच्या भाषणात ‘हिंदूंच्या वाट्याला गेलात, तर शिरछेद करू’, अशी धमकी दिल्याचा आरोप पोलिसांनी केला. मद्दुरूमध्ये विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या विरोधात निदर्शने चालू झाल्यानंतर मद्दूरूमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, रवि यांनी नुकतेच मद्दुरूमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या वेळी प्रक्षोभक भाषण केले. त्यामुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण झाला.
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी हिंसाचारग्रस्त मद्दुरू प्रदेशाला भेट देणार्या भाजपच्या नेत्यांवर टीका केली. शिवकुमार यांनी भाजप नेत्यांना देहलीला भेट देऊन केंद्राकडून विकास प्रकल्पांना संमती मिळवण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील शांतता भंग करण्याचा आरोप रा.स्व. संघ आणि भाजप यांच्यावर केला.
संपादकीय भूमिकाकर्नाटक पोलिसांकडून अशी तत्परता कधी चिथावणीखोर भाषण करणार्या धर्मांध मुसलमानांना अटक करण्याच्या संदर्भात दाखवली जाते का ? |
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण