
पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करावे, या महापालिकेच्या धर्मद्रोही आवाहनाला पुणेकरांनी प्रतिसाद दिला. १० दिवसांत ६ लाख ५४ सहस्र ४१० श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत विसर्जन झालेल्या मूर्तीची संख्या जवळपास १ लाखाने वाढली आहे. ९ लाख २३ सहस्र ३९८ किलो निर्माल्य जमा झाले आहे. संपूर्ण गणेशोत्सवात ३८ हौदांमध्ये १ लाख १३ सहस्र १३६ मूर्तीचे विसर्जन झाले. लोखंडी टाक्यांमध्ये ३ लाख ६२ सहस्र ३१९ मूर्तींचे विसर्जन झाले. १ लाख ७८ सहस्र ९५५ मूर्ती संकलित करण्यात आल्या आहेत.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले की, ‘मूर्ती विसर्जनाऐवजी मूर्तीदान करावे’, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी ६ लाख ५४ सहस्र ४१० मूर्तींपैकी १ लाख ७८ सहस्र ३७६ मूर्तीदान केल्या आहेत. (दान केलेल्या मूर्ती खाणीत टाकल्या जातात, रस्ता बुजवण्यासाठी मूर्तीचा वापर केला जातो, असे लक्षात आले आहे. मूर्तींची विटंबना होत असल्याचे कित्येक व्हिडिओ सामाजिक माध्यमावर दिसून येतात. अशा कामासाठी श्री गणेशमूर्ती देऊन भाविकांनी श्री गणेशाची कोणती कृपा संपादन केली आहे ? याचा भाविकांनी विचार करावा ! – संपादक)
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !