भोई समाज गणेशोत्सव मिरवणुकीतील डीजेसमोर पोलिसांकडूनच नृत्य !

(डीजे म्हणजे मोठा आवाज करणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा)
मिरज, ९ सप्टेंबर (वार्ता.) – सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे सांगली पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत टाहो फोडून आवाहन केले होते; परंतु त्याला काही मंडळे वगळता इतर गणेशोत्सव मंडळांनी बगल देऊन डीजेचा वापर करून मिरवणूक काढली. विशेष म्हणजे मिरज येथील भोई समाजाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी आणलेल्या डीजेसमोरच पोलीस नाचत होते. त्यामुळे पोलिसांकडून डीजेमुक्त अभियानाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे दिसून आले. (नियम स्वत:च मोडणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद आहे. मिरवणुकीत नाचणार्या पोलिसांवर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी कारवाई करावी, असे जनतेला वाटल्यास नवल ते काय ! – संपादक) काही मंडळांनी त्याला प्रतिसाद देत पारंपरिक वाद्यांच्या निनादात विसर्जन मिरवणूक काढली होती.
पोलिसांनी स्वतः आवाहन केल्याप्रमाणे पोलिसांनीही विसर्जन मिरवणुकासाठी ढोल-ताशा पथकांच्या निनादात मिरज शहर पोलिसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले; परंतु या वर्षी भोई समाज मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी मागे ठेवण्यात आली होती. ही मिरवणूक डीजेच्या आवाजात निघाली.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !