
घाटनांद्रा – लासूर स्टेशन येथील क्षीरसागर कुटुंबाने यंदा महालक्ष्मीमातेच्या देखाव्यातून पहलगाम आक्रमण आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा साकारला आहे. सायली योगेश क्षीरसागर यांनी अत्यंत बारकाईने हा देखावा सिद्ध केला. १ सप्टेंबर या दिवशी त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी भेट देऊन या देखाव्याचे कौतुक केले. ‘वैजापूर मर्चंट बँकेचे संचालक आणि युवा उद्योजक प्रीतमशेठ मुथा यांनी देखाव्याचे विशेष कौतुक केले.
महालक्ष्मी उत्सवाच्या निमित्ताने क्षीरसागर कुटुंब गेली १३ वर्षे विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करत आहे. यामध्ये ‘स्वच्छ भारत अभियान, महाड-सावित्री नदी दुर्घटना, कोल्हापूर पूरस्थिती, हर घर तिरंगा, जल जीवन मिशन, लाडकी बहीण योजना’ अशा विषयांचा समावेश होता. यावर्षी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवादी तळांवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे हुबेहूब चित्रण करण्यात आले होते. भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करणारा हा देखावा पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण